जालन्यात २३० नवीन कोरोनाग्रस्त

जालन्यात २३० नवीन कोरोनाग्रस्त

जालना -  मागील काही दिवसांपासून रोजच नव्याने कोरोनाबाधित रुग्णांची मोठी वाढ होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल तीन हजार ३५३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी तब्बल दोन हजार ५७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. परिणामी सध्या एक हजार १९१ कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत १०५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे. गुरुवारी तब्बल २३० नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथील ५४ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दरम्यान, नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असताना तर दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. गुरुवारी तब्बल १४८ कोरोनाबाधित रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण दोन हजार ५७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे एक हजार ८३ कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. 

जिल्ह्यात तब्बल १४८ कोरोनाबाधित रुग्ण गुरुवारी (ता.१३) कोरोनामुक्त झाले आहेत. यात संभाजीनगर येथील २२ जण, अंबड तालुक्यातील महाकाळा येथील २०, भोगगाव येथील ११, जालना शहरातील नऊजण, अंबड तालुक्यातील शहागड, वाळकेश्वर व परतूर तालुक्यातील आष्टी येथील प्रत्येकी सहाजण, जालना शहरातील चंदनझिरा व अंबड शहरातील सुरंगेनगर येथील प्रत्येकी चार, जालना शहरातील मूर्तीवेस, म्हाडा कॉलनी, मोदीखाना, परतूर शहरातील मोमीन मोहल्ला, कुंभार पिंपळगाव, दुधा (ता. मंठा) येथील प्रत्येकी तीनजण, महावीर चौक, माणिकनगर, पुष्पकनगर, साईनगर, रामनगर, शाकुंतलनगर, डिग्रस (जि. बुलडाणा) येथील प्रत्येकी दोनजण, तर जालना शहरातील बरवार गल्ली, करवानगर, हनुमान रोड, रहेमानगंज, तुळजाभवानीनगर, कादराबाद, आनंदीस्वामी गल्ली, सोनलनगर, क्रांतीनगर, कुंभारगल्ली, कालीकुर्ती, लक्कडकोट, बुऱ्हाणनगर, जिल्हा परिषद पाठीमागे, अलंकार टॉकीज परिसर, माळीपुरा, इंदिरानगर, मंमादेवीनगर, पीरगैबवाडी, न्हावा, बदनापूर, सिंदखेडराजा, बुटखेडा, भराडी (ता. अंबड), रवना पराडा, पाथरवाला, अंकुशनगर येथील प्रत्येकी एकजण कोरोनामुक्त झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत दोन हजार ५७ जण उपचाराअंती कोरोनातून बरे झाले आहेत. 

या भागात नवीन कोरोनाबाधित 

जिल्ह्यातील तब्बल २३० जण कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये फत्तेपूर येथील दहा, शहरातील कन्हैयानगर व खासगाव येथील प्रत्येकी सहाजण, केळीगव्हाण व परतूर शहरातील रामेश्वरगल्ली येथील प्रत्येकी पाचजण, लेहा (ता. भोकरदन) येथील तीनजण, करवानगर, मेहरा बु. (ता. चिखली), मेहकर, डोदा तांगडा, आडगाव भोपे, पिंपळगाव रेणुकाई, विझोरा (ता. भोकरदन), देवगाव (ता. बदनापूर) येथील प्रत्येकी दोनजण, जालना शहरातील रामनगर, सामान्य रुग्णालय निवासस्थान, दत्तनगर, एमआयडीसी, संजयनगर, महसूल कॉलनी, सरस्वती कॉलनी, आनंदवाडी, राज्य राखीव पोलिस गटातील जवान, सराफानगर, वाकुळणी, वरूड बु., श्रीकृष्णनगर, निधोना, नागेवाडी, बालाजी पार्क, अंबड शहरातील बालाजीनगर, सिंदखेडराजा, वरूड, देऊळगावराजा, किन्होळा, शेलगाव (जि. बीड), पांगरी गोसावी, रांजणीवाडी (ता. घनसावंगी) वाढोणा, पोखण (ता. भोकरदन) येथील प्रत्येकी एकजण कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर अँटीजेन तपासणीद्वारे ४५ अशा एकूण १२२ व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर रात्री उशिरा पुन्हा १०८ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले. ६६ अहवाल हे आरटीपीसीआर प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह आले. तर ४२ अहवाल हे रॅपिड अँटीजेन टेस्टद्वारे पॉझिटिव्ह प्राप्त झाले. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल तीन हजार २५३ जण कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. 

जालन्यातील १६ भाजीपाला व फळविक्रेते पॉझिटिव्ह 

जालना शहरातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी भाजीपाला व फळविक्रेते यांची गुरुवारपासून रॅपिड अँटीजेन तपासणीद्वारे कोरोना चाचणी करण्यास सुरवात केली आहे. तपासणीत मल्टिपर्पज हायस्कूल येथे २६० जणांची तपासणी करण्यात आली. यामध्ये पाच पॉझिटिव्ह आले. फुलंब्रीकर नाट्यगृह येथे १७३ जणांची तपासणी केली असता ११ पॉझिटिव्ह तर जुना मोंढा येथे ११६ जणांची तपासणी केली असता येथे एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही. या तीनही ठिकाणी एकूण ५४९ भाजीपाला व फळविक्रेत्यांची अँटीजेन तपासणी केली असता १६ विक्रेते पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. ही उर्वरित भाजीपाला व फळेविक्रेत्यांची कोरोना चाचणी शुक्रवारी (ता. १४) या ठिकाणी केली जाणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com