esakal | कोरोना : सचखंड गुरूद्वारा बोर्ड अधिक्षकांसह ६० जणांवर गुन्हे
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या सचखंड गुरूद्वारा बोर्डाच्या अधिक्षक व ओएसडीसह जिल्हाभरात मंगळवारी (ता. ३१) रात्री उशिरा ६० जणाविरुद्ध विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत

कोरोना : सचखंड गुरूद्वारा बोर्ड अधिक्षकांसह ६० जणांवर गुन्हे

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : कोरोना या महामारीचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. हा आजार पसरणार नाही यासाठी शासनाकडून जमावबंदी लागु करण्यात आली. मात्र जमावबंदी व लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या सचखंड गुरूद्वारा बोर्डाच्या अधिक्षक व ओएसडीसह जिल्हाभरात मंगळवारी (ता. ३१) रात्री उशिरा ६० जणाविरुद्ध विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

देशासह राज्यातही कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी रविवारी (ता. २२) मार्च रोजी संपूर्ण देशभरात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदीचे आदेश लागू केले होते. संचारबंदीचे आदेश लागू असल्याने महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. 

हेही वाचानांदेड जिल्ह्यासाठी ३० हजार सुरक्षा किटची गरज

कोरोनाबाबत घेतली नाही काळजी

असे असताना संचारबंदी आदेश तब्बल ६० जणांनी धुडकावले. संचारबंदीचा भंग केला. यात सचखंड गुरद्वारा बोर्डाचे अधिक्षक गुरूविंदरसिंग वाधवा, प्रशासकिय अधिकारी (ओएसडी) डी. पी. सिंघ, रविंद्रसिंग कपुर यांनी सचखंड गुरुद्वारामध्ये जाणिवपूर्व कोरोना विषाणूचा संसर्गाचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी न घेता आलेल्या सर्व भाविकांना गुरुद्वारात प्रवेश देऊन जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली केली. 

यांच्यावर झाले गुन्हे दाखल : 

इतवारा पोलिस ठाणे - घासीराम दुर्गादास रौत्रे, बालाजी धरमसिंह सगर, सुभाष पेन्टाजी वैद्य आणि सलमान अखिल शेख. भाग्यनगर पोलिस ठाणे- शेख महेबुब शेख हुसेन आणि बिस्मिलाखान शेरुखान. शिवाजीनगर पोलिस ठाणे - अब्दुल नईम अब्दुल मनान आणि मकरंद गोपाल परमवार. 
वजिराबाद पोलिस ठाणे - अमोल बबन खडसे, शेख हबीब शेख रहीम, आकाश सखाराम गोडबोले, अब्दुल शबीर अब्दुल जानीमिया, अतुल भगवान कांबळे, आनंद मुरली आलपाल, शांतीलाल हरकाजी मिना, सुभम सुरेश हिंगोले, मोहमद एजाज अब्दुल लतीफ, विनायक मसनाजी कोमावार आणि सचीन विजय जगताप.

येथे क्लिक करा लॉकडाऊनमध्ये करा योगा आणि प्राणायाम

ग्रामिण भागातही गुन्हे दाखल

तसेच नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात सहा, नायगाव तीन, देगलूर एक, सिंदखेड एक, माळाकोळी दोन, हिमायतनगर दोन, हदगाव चार, बारड एक, इस्लापूर एक, कुंडलवाडी दोन, कुंटुर दोन, लिंबगाव पाच, अर्धापूर तीन, भोकर सात आणि मरखेल एक अशा ६० जणांवर शासकिय आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.