esakal | जावईबापू सांभाळून ! पाहुणचाराचा बेत अंगलट येऊ शकतो
sakal

बोलून बातमी शोधा

2Sakal_20News_11

भारतीय संस्कृतीत अधिक मासाला महत्त्व आहे.

जावईबापू सांभाळून ! पाहुणचाराचा बेत अंगलट येऊ शकतो

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (जि.उस्मानाबाद) : भारतीय संस्कृतीत विविध सण, धार्मिक विधी, तिथींना स्थान आहे. दर तीन वर्षाने येणाऱ्या अधिक मासाला (धोंड्याचा महिना) अनन्य साधारण महत्त्व आहे. तो १८ सप्टेंबरला सुरू झाला असून १८ ऑक्टोबरला त्याची समाप्ती आहे. धोंड्याचा महिना कोरोना संसर्गाच्या कालावधीत आल्याने पाहुणचारावर बरीच बंधन आली आहेत, तरीही बऱ्याच कुटुंबात धोंडे जेवणाचा बेत आखला जातोय.

विशेषतः नवीन लग्न झालेल्या जावईबापूच्या सन्मानासाठी उठाठेव सुरू आहे. कोरोनाचा संसर्ग गेल्या सहा महिन्यांपासून सुरू आहे. बाधितांची संख्या अठराशेच्या उंबरठ्यावर आली आहे. जवळपास पन्नास जणांचा मृत्यु झालेला आहे. उपचारानंतर बरे झालेल्या लोकांची संख्या एक हजार ४५२ आहे. संसर्गाचा वेग आणखी कमी होत नाही. माझे कुटुंब, माझी जबाबदारी" या अभियनाअंतर्गत सर्वे सुरु आहे, अशा स्थितीत गर्दी करुन पाहुणचाराचा बेत अंगलट येऊ शकतो.

शेतकऱ्यांने सोयाबीन बियाणे राखून ठेवण्याची संधी- बुरशीनाशक फवारण्याचा कृषी...


जरा सांभाळून
लॉकडाउनच्या काळात लग्नसराई होती. मात्र मंगल कार्यालयावर बंदी होती. पन्नासपेक्षा कमी लोकांच्या उपस्थितीत बरीच लग्न लपून - छपून झाली. लॉकडाउनमुळे लग्न खर्चावर मर्यादा आल्या असल्या तरी आता धोंड्याच्या महिन्यात रूसवी-फुगवी दूर करण्यासाठी सासरच्या मंडळीच्या आशा, आकांक्षा पुरवण्याचा प्रयत्न करावा लागत आहे. संसर्ग असल्याने मोठ्या सावधगिरीने धोंडे जेवणाचा, वस्त्रदानासह अन्य लहान आकाराच्या चांदी, सोन्याच्या धोंडे दान करण्याचा कार्यक्रम करावा लागत आहे.

मात्र " धोंड्या " वर कोरोनाचा निशाना साधला तर मोठी पंचाईत होण्याची भिती आहे. त्यामुळे जावईबापूसह नातेवाईकांना सांभाळूनच धोंडे जेवणाचा कार्यक्रम करावा लागत आहे. परराज्य, परजिल्ह्यातील नातेवाईक येणार असतील तर अधिकच काळजी करावी लागत आहे. दरम्यान नुकतेच लग्न झालेल्या जावईबापूंना धोंडे जेवणाचे निमंत्रण असते असे नाही तर लेकूरवाळ्या माहेरवाशीण व जावायांना निमंत्रण दिले जाते.

अकरा तलाव तुडुंब, अकरा तलावांनी गाठली पन्नाशी    

अन्य नातेवाईकही त्यात सहभागी असतात. मात्र सद्यःस्थितीतील वातावरण गर्दी करायचे राहिलेले नाही. चांगल्या आहाराचा सल्ला आणि त्याचे सेवन महत्त्वाचे ठरत आहे. तळीव पदार्थ मोजकेच खावे लागतील, अशी स्थिती आहे. काही नातेवाईक धोंडे जेवणाचा बेत नाकारत आहेत, तर दोन्ही कुटुंबांची हौस असल्याने बऱ्याच ठिकाणी जेवणावळी होताहेत.

संपादन - गणेश पिटेकर

loading image
go to top