कोरोनाने शिकविला संघर्षातून मार्ग 

बाबासाहेब गोंटे 
Saturday, 18 April 2020

अत्यावश्‍यक वस्तूंची विक्री वगळता अन्य दुकानेही बंद झाली. त्यामुळे पारंपरिक व्यवसाय बंद असल्याने अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न उद्‍भवला आहे. अशा या कोरोनाच्या संघर्षातून अनेकांना मार्गही मिळाला आहे. पारंपरिक व्यवसाय बंद असल्याने अनेकांनी भाजी विक्री, फळविक्री, मास्क विक्री असे पर्यायही शोधले आहेत.

अंबड - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून लॉकडाउन करण्यात आले. अत्यावश्‍यक वस्तूंची विक्री वगळता अन्य दुकानेही बंद झाली. त्यामुळे पारंपरिक व्यवसाय बंद असल्याने अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न उद्‍भवला आहे. अशा या कोरोनाच्या संघर्षातून अनेकांना मार्गही मिळाला आहे. पारंपरिक व्यवसाय बंद असल्याने अनेकांनी भाजी विक्री, फळविक्री, मास्क विक्री असे पर्यायही शोधले आहेत.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउनमुळे गत वीस ते पंचवीस दिवसांपासून दुकाने कुलूपबंद आहेत. यामुळे व्यवसायाला पूर्णपणे खीळ बसली आहे. अनेक छोटे व्यापारी, विक्रेते भाडेतत्त्वावर गाळे घेत व्यवसाय करतात. शिवाय घराचे भाडेही आहेच.

हेही वाचा : जालन्याच्या इतिहासात प्रथमच स्टील उद्योग बंद

हेअर सलून, चप्पल-बूट विक्रेते, हॅाटेलसह पारंपरिक व्यवसाय बंद आहेत. संचारबंदीच्या काळात सध्या जीवनावश्यक भाजीपाला, दूध, फळांची विक्री सुरू असली तरी ती दिवसभरात चार ते पाच तासांपुरती आहे. दुकान, घराचे भाडे देण्यासाठी व पोटाची भूक भागविण्यासाठी रिकाम्या हाताने बसून चालणार नाही.

हेही वाचा :  लॉकडाऊनमध्ये मजुरांच्या हाताला मिळणार काम

आलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी अनेक व्यावसायिकांनी भाजीपाला, फळ, दूध, मास्कची विक्री सुरू केली आहे. 

कोरोनामुळे उभ्या आयुष्यात पहिल्यांदा सरासरी महिनाभर दुकान बंद ठेवण्याची वेळ आली आहे. हाताला रोजगारच मिळत नाही. तर 
अशा परिस्थितीमध्ये दुकानाचे व घराचे भाडे भरावे तरी कसे? यामुळे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. 
- कैलास कानडे, केशकर्तनकार 

शहरात परिवारासह राहतो. संसाराचा गाडा चालविण्यासाठी चप्पल-बुटांचे दुकान बंद झाली आहे. जगण्यासाठी दुसरे साधन शिल्लक राहिले नाही. यामुळे 
पोटाची खळगी भागविण्यासाठी रस्त्यावर भाजीपाला विक्री करीत आहे. 
- मुनाफ शेख, व्यापारी 

पोट भरण्यासाठी तसेच मुलांच्या शिक्षणासाठी शहरात आलो आहे. हाताला रोजगार मिळावा म्हणून चहाचे हॅाटेल सुरू केले होते; मात्र संचारबंदी व 
लॅाकडाउनच्या काळात बंद पडल्याने आता द्राक्षांची विक्री करीत आहे. 
- राजेश सावजी, हॅाटेल व्यावसायिक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona taught the way of earn