Coronavirus : हे जिल्हाधिकारी कार्यालय हादरले, अधिकाऱ्याच्या कुटुंबातील एकाला कोरोना

महेश गायकवाड
Monday, 15 June 2020

चौदा रुग्णामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील एका अधिकाऱ्याच्या कुटुंबातील व्यक्तीचा समावेश असल्याने खळबळ उडाली असून जिल्हाधिकारी कार्यालयालयातील कर्मचाऱ्यांमध्ये भीती पसरली आहे. 

जालना : आरोग्य विभागाला सोमवारी (ता.१५) १४ संशयिताचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली आहे. या चौदा रुग्णामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील एका अधिकाऱ्याच्या कुटुंबातील व्यक्तीचा समावेश असल्याने खळबळ उडाली असून जिल्हाधिकारी कार्यालयालयातील कर्मचाऱ्यांमध्ये भीती पसरली आहे. 

 

लॉकडाउनचा ‘मुहूर्त’ साधून बालविवाहाचे ‘शुभमंगल’!  
 

जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक हळूहळू वाढत आहे. दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण वाढत असल्याने आतापर्यंत २७७ रुग्ण आढळून आले आहे. सोमवारी पुन्हा १४ संशयित व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने बाधितांचा आकडा २९१ झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे नवीन १४ रुग्णामध्ये एक रुग्ण हा जिल्हाधिकारी कार्यालयातील एका अधिकाऱ्याच्या कुटुंबातील सदस्य असून सदर अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेकांच्या संपर्कात आले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचीही कोरोना चाचणी करावी लागणार असल्याची माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली आहे. 

 

लॉकडाउनचा ‘मुहूर्त’ साधून बालविवाहाचे ‘शुभमंगल’!  
 

या भागातील आहेत रुग्ण :
सोमवारी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये जालना शहरातील वाल्मीकनगर मधील १, राज्य राखीव दलातील चार जवान , दर्गावेश परिसरातील एक, भाग्यनगर मधील २, कादराबादमधीक ३, शंकर नगर मधील एक, समर्थ नगरमधील एक व अंबड शहरातील एका व्यक्तीचा समावेश आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona update jalna increase 14 corona positive