esakal | कोरोना अपडेट : हिंगोलीत दोन कोरोनाबाधित रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

कळमनुरी येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील पंधरा जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी दोन दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दोन नमुने अनिर्णयीत ठेवण्यात आले आहेत. चार अहवाल रिजेक्टेड तर सात जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 

कोरोना अपडेट : हिंगोलीत दोन कोरोनाबाधित रुग्ण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : जिल्ह्यात रविवारी (ता.२१) दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून दोन कोरोनामुक्त रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आज आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये दोन मुलींचा समावेश असून एका मुलीचे वय दोन वर्ष असून दुसऱ्या मुलीचे वय आठ वर्ष असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीबास यांनी दिली. 

नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असलेल्या कळमनुरीतील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील दोन्ही रुग्ण आहेत. तर तालुक्यातील खानापूर चित्ता व वसमत येथील कुरेशी मोहल्ला येथील प्रत्येकी एक रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २४० रुग्ण संख्या झाली असून यापैकी २१२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या २८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

हेही वाचाहिंगोली जिल्ह्यातील अकरा गावे ठरली हॉटस्‍पॉट -

रुग्णामध्ये मुलींचा समावेश

दरम्यान, नांदेड येथे उपचार घेत असलेल्या कळमनुरी येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील पंधरा जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी दोन दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दोन नमुने अनिर्णयीत ठेवण्यात आले आहेत. चार अहवाल रिजेक्टेड तर सात जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दोन जणांचे पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णामध्ये मुलींचा समावेश असून एका मुलीचे दोन दुसऱ्या मुलीचे वय आठ वर्ष आहे. 

कळमनुरी येथे सात रुग्ण दाखल

वसमत येथील कोरोना केअर सेंटरमध्ये तीन रुग्ण उपचार घेत असून यात बुधवार पेठ, अशोक नगर व मुरुंबा येथील रुग्णांचा समावेश आहे. तसेच कळमनुरी येथील कोरोना केअर सेंटरमध्ये सात रुग्ण असून यात काजी मोहल्ला दोन, दाती तीन, डोंगरकडा एक, टव्हा येथील एका रुग्णाचा समावेश आहे. 

धूत हॉस्पिटलमध्ये एक जवान दाखल 

कळमनुरी येथील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये एसआरपीएफ चे तीन जवान दाखल असून यातील एका रुग्णास औरंगाबाद येथील धूत हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले आहे. लिंबाळा येथील कोरोना केअर सेंटरमध्ये दोन रुग्ण असून यात कनेरगाव व संतुकपिंप्री येथील रुग्णाचा समावेश आहे.

येथे क्लिक करापोलिस मुख्यालयातच कर्मचाऱ्याची गोळी झाडून आत्महत्या -

आयसोलेशन वार्डात अकरा रुग्ण

जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात अकरा रुग्ण असून यात भगवती तीन, पेन्शनपुरा चार, भोईपुरा एका. कमला नगर (वसमत) एक, सम्राट नगर(वसमत) एक, जवळा बाजार येथील रुग्णाचा समावेश आहे. सेनगाव येथील कोरोना केअर सेंटरमध्ये एका रुग्णाचा समावेश आहे. 

२४४ रुग्णाचे अहवाल प्रलंबित

जिल्ह्यातील आयसोलेनेश वार्ड, सर्व कोरोना केअर सेंटर व गाव पातळीवर तयार करण्यात आलेल्या क्वारंटाइन सेंटरमध्ये आतापर्यंत चार हजार ५२ संशयित रुग्ण दाखल करण्यात आले होते. त्यापैकी तीन हजार   ६१७ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर तीन हजार २७४ व्यक्तींना घरी सोडण्यात आले आहेत. सध्या ७५६ संशयित भरती असून २४४ जणांचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.