Corona Breaking : उदगीरात कोरोनाचा आठवा बळी; ७० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

युवराज धोतरे 
Sunday, 5 July 2020

उदगीर शहरातील कोव्हिड रूग्णालयात शुक्रवारी (ता.३) देवणी परिसरातील एका सारी रुग्णाचा मृत्यू झाला. त्याचा स्वॅब तपासणीसाठी पाठवला असता अहवाल अनिर्णित आला आहे. त्यानंतर शनिवारी रात्री बाराच्या सुमारास  शहरातील देगलूर रोड भागातील कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

उदगीर : शहर व परिसरात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यात शनिवारी (ता.४) रात्री अकराच्या सुमारास एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या आठ झाली असून उदगीर परिसरात खळबळ उडाली आहे.

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  
उदगीर शहरातील कोव्हिड रूग्णालयात शुक्रवारी (ता.३) देवणी परिसरातील एका सारी रुग्णाचा मृत्यू झाला. त्याचा स्वॅब तपासणीसाठी पाठवला असता अहवाल अनिर्णित आला आहे. त्यानंतर शनिवारी रात्री बाराच्या सुमारास  शहरातील देगलूर रोड भागातील कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!

उदगीर शहर व परिसरात आतापर्यंत एकूण १२२ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी यशस्वी उपचारानंतर एकूण ९२ रुग्णांना डिस्चार्ज देऊन घरी पाठवण्यात आले आहे. पैकी आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्या ३१ अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार चालु आहेत. शनिवारी (ता.४) उदगीरात तीन तर नेत्रगाव येथे एक अशा एकूण नवीन चार रूग्णाची भर पडली असल्याची माहीती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ सतिष हरिदास व कोव्हिड  रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. शशिकांत देशपांडे यांनी दिली आहे.

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

उदगीर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत असलेली कोरोना बाधित रुग्णांची संख्या व निलंगा, चाकूर, अहमदपूर, जळकोट, येथून उदगीरला येणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता शहरातील कोविड रुग्णालय व तोंडार पाटी येथील शासकीय वसतिगृह येथे रुग्णांची प्रतवारी करून दोन ठिकाणी उपचार करण्यात येत आहेत. लक्षणे दिसत नसलेल्या रुग्णांना तोंडार पाटी येथे तर लक्षणे असलेल्या व गंभीर असलेल्या रुग्णांना कोविड रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना सोमनाथपुर येथील शासकीय वसतिगृहात क्वारंटाईन करण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona update Udgeer 70 year old person corona death