कोरोना : ‘या’ जिल्ह्यात अंगणवाडी-आशा सेविकांची वाट बिकट   

File Photo
File Photo

नांदेड : अर्धापूर तालुक्यातील दाभड ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स सर्वचे काम करत आहेत. परंतु, हे काम करताना आम्हाला हेतुपुरस्सर ग्रामसेवक श्री. कापसे अपमानास्पद वागणूक देत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स यांनी अर्धापूरच्या गटविकास अधिकारी मिना रावतोळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.  

अंगणवाडी कर्मचारी व आशा वर्कर कोरोना विषाणू व सारी आजाराचे सर्वे करण्याचे काम दाभड येथे करत आहेत. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार काम सुरु आहे. मात्र गावात तलाठी यांच्या अध्यक्षतेखाली ‘कोरोना’ प्रतिबंध समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यानुसार सर्व कामे व्यवस्थित सुरु असले तरी, अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर ग्रामसेवक श्री. कापसे यांच्या अडमुठ्या धोरणावर प्रचंड मानसिक ताणावाखाली वावरत आहेत. 

या कामासाठी टाकला जातोय दबाव

तणावाखाली असलेल्या या महिला कर्मचाऱ्यांनी ग्रामसेवकावर वेठीस धरत असल्याचा आरोप लेखी स्वरूपात केला आहे. त्यात म्हटले आहे की, सर्व कर्मचाऱ्यांनी माझ्या आदेशाचे पालन केलेच पाहिजे. मी सांगेल तसेच झाले पाहिजे. गावातील अंगणवाडी आणि आशा वर्कर महिलांनी गावाच्या वेशीवर थांबून अनोळखी व्यक्तींना गावात येण्यापासून प्रतिबंध करावे अशा प्रकारचा दबाव टाकला जात असल्याने आमचे मानसिक संतुलन बिघडत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. 

महिलांसाठी वापरली जाते अर्वाच्च भाषा

अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांना शासनाकडून प्रोत्साहन भत्ता म्हणून एक हजार रुपये मानधन दिले जात आहे. परंतु हे मानधन मास्क तयार करण्यासाठी ते मागत असल्याचा देखील महिलांनी आरोप केला आहे. गावातील बचत गटातील महिलांनाही प्रत्येकी पन्नास ते शंभर रुपयांची मागणी होत आहे. कुठलाही ठराव नसताना बैठक न घेता परस्पर मागणी करत आहेत. तसेच गावात कोरोना प्रतिबंधात्मक समिती कार्यरत असताना ते हेतूपुरस्पर आम्हाला त्रास देण्यासाठी असं वर्तन करत आहेत. हद्द म्हणजे महिलांना बोलताना अर्वाच्च भाषा वापरतात त्यामुळे त्यांच्या कारवाई करण्याची मागणी निवेदनात केली आहे.  

या चार महिलांची केली कारयवाहीची मागणी

दाभड येथील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्या दुर्लक्षित पणाचा कळस गाठल्याने या प्रकारच्या घटना घडत असल्याचे नागरिकांतून बोलल्या जात आहे. संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करून कार्यवाही करावी, अशी मागणी वंदना सूर्यवंशी, रत्नमाला आवरगंड, पंचशीला सरपाते, शोभा नरवाडे यांनी केली आहे.  

प्रकरणाची चौकशी करणार
चार महिलांनी ग्रामसेवका विरोधात तक्रार केल्याची बातमी वर्तमानपत्रातुन समजली. रविवार असल्याने त्यावर अधिक काही बोलता येणार नाही. परंतु, सोमवारी नेमके काय प्रकरण झाले आहे याची चौकशी केली जाईल. यात ते दोषी आढळले तर निश्‍चितच कारवाई होईल.  
- मिना रावतोळे (ग्रामविकास अधिकारी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com