esakal | Video - लॉकडाउन : स्ट्रेस कमी करण्यासाठी तज्ज्ञ सांगतात... 
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded News

‘कोरोना’ विषयीच्या बातमयांचा अक्षरशः सर्वांनाच कंटाळा आला आहे. मुलांच्या अभ्यासाचा प्रश्न आहे. मुलं परेशान करत आहेत. या सगळ्या गोष्टींमुळे आपण ग्रस्त आहोत. त्यामुळे लॉकडाउनचे सुवर्णसंधीमध्ये कसे रुपांतर करायचे याचा विचार खरं तर सर्वच पालकांसह विद्यार्थ्यांनी करण्याची वेळ आहे.  

Video - लॉकडाउन : स्ट्रेस कमी करण्यासाठी तज्ज्ञ सांगतात... 

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड : कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी देश लाॅकडाउन करण्यात आला आहे. त्यामुळे घरात बंदिस्त झालेली मोठी माणसंच नव्हे तर लहान मुलांमध्येही स्ट्रेस वाढत असल्याचे चित्र आहे. विशेष करून नवजात बाळ आणि बारा वर्षाखालील मुले यांची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. त्यांची काळजी कशी घ्यावी? काय करावे? आणि काय करु नये? याविषयी बालरोगतज्ज्ञ डाॅ. रमेश रेंगे यांनी दिलेली माहिती खास ‘ई-सकाळ’च्या वाचकांसाठी येथे देत आहोत.

सध्या लाॅकडाउनचा काळ आहे. त्याला एक महिना होऊन गेल्यामुळे लॉकडाउन सर्वांसाठीच एक मोठी समस्या झाल्याचे वास्तव बघायला मिळत आहे.  पती पत्नींना एवढा वेळ कधीच एकमेकांसोबत राहण्याचा योग आलेला नाही. तो लॉकडाउनमुळे आला आहे. सद्यस्थितीत टीव्ही, मोबाईल, इंटरनेट, मुव्हीज यासह ‘कोरोना’ विषयीच्या बातमयांचा अक्षरशः सर्वांनाच कंटाळा आला आहे. मुलांच्या अभ्यासाचा प्रश्न आहे. मुलं परेशान करत आहेत. या सगळ्या गोष्टींमुळे आपण ग्रस्त आहोत. त्यामुळे लॉकडाउनचे सुवर्णसंधीमध्ये कसे रुपांतर करायचे याचा विचार खरं तर सर्वच पालकांसह विद्यार्थ्यांनी करण्याची वेळ आहे.  

हेही वाचा - Coronavirus - युरोपातून बीडच्या युवकाचा तो व्हिडिओ आला, महाराष्ट्र खडबडून जागा झाला...
 
आयुष्यामध्ये पती-पत्नींना एवढा सुवर्णसंधीचा काळ कधीच मिळाला नाही. त्यामुळे या संधीचा सदुपयोग करायला पाहिजे. एकमेकांना समजून घेवून एकमेकांविषयीच्या प्रेमाचे संबंध अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न लॉकडाउनमध्ये शक्य आहे. कारण दररोजच्या धावपळीमध्ये ही संधी मिळणे शक्यच होत नव्हते. मुलांमध्ये भारतीय संस्कार काय आहे, हे रुजविण्याची सुवर्णसंधी आहे. भारतीय स्वयंपाक, चविष्ट पदार्थ याचे प्रशिक्षण मुलांना दिले पाहिजे. पाश्चिमात्य आहारापासून मुलांना दूर ठेवणे आवश्‍यक आहे. 

आळशी बनू नका
लॉकडाउनच्या काळात मुलांसोबत भरपूर खेळा. जिवनाचा मुक्त आनंद घ्या. आपल्या ज्येष्ठ असलेल्या आई-वडिलांची सेवा करण्यासाठी सदुपयोग केला पाहिजे. या दरम्यान मोबाईल, टिव्ही, इंटरनेटचा गैरवापर करणे टाळायला पाहिजे. मुलांनी लॉकडाउनच्या काळात आई-वडिल, भाऊ-बहिण, शेजारी यांच्यासोबत संवाद साधून त्यांना समजून घेऊन संधीचे सोने करा. मनसोक्त खेळा. भरपूर व्यायाम करा आणि आपले छंद जोपासण्यासाठी या संधीचे सोने करा. मात्र, घराबाहेर पडू नका. उन्हामध्ये खेळू नका. आई-वडिलांना त्रास देऊ नका. सर्वात महत्त्वाचे आळशी बनू नका, असा मंत्रही डॉ. रमेश रेंगे यांनी मुलांना दिला आहे.

हे देखील वाचायलाच पाहिजे - परशुराम कर्मचारी महासंघाचे कार्य प्रेरणादायी, कसे? ते वाचाच

लॉकडाउनमध्ये पालकांनी अशी काळजी घ्यावी

  1. मुलांना फक्त टीव्ही, मोबाइलमध्ये गुंतवून ठेवू नका.
  2. मुलांना छोट्या छोट्या गोष्टीत व्यस्त ठेवा
  3. घरकामामध्ये मुलांची मदत घ्या.
  4. जेवण बनवणं, डस्टिंग किंवा किचनमधील इतर कामांमध्ये मुलांना सहभागी करून घ्या.
  5. दररोज वेळ काढून त्यांच्यासोबत बाल्कनीत किंवा गच्चीवर खेळावे.
  6. घराबाहेर जाणं शक्य नसेल तर घरातल्या घरात कॅरम, बुद्धीबळ, सापसिडी आदी बैठे खेळ खेळावे.
  7. रात्री किंवा दिवसा त्यांना गोष्टी सांगाव्यात. शिवाय त्यांनाही एखादी गोष्ट सांगण्यासाठी प्रेरित करा.
  8. मुलांच्या मनातील भीती दूर करून त्यांच्यामध्ये विश्वास जागवा.
  9. खोकताना, शिंकताना तोंड झाकून घेणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं, हात धुण हे सर्व त्यांना शिकवा.
loading image