Breaking News - बीडमध्ये कोरोनाचा पहिला बळी, सुरक्षित जिल्ह्याला हादरा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

बीड : कोरोनाग्रस्त रुग्णाचा सोमवारी (ता. १८) पहाटे मृत्यू झाला. मुंबईवरून शनिवारी (१६) परतलेल्या दोन रुग्णांनंतर रविवारी (१७) पुन्हा सात रुग्ण आढळले होते. नगर जिल्ह्यातील पिंपळगाव हुडा येथील एक कुटुंब मुंबईत वास्तव्यास होते. नगर जिल्हा कोरोना रिस्की असल्याने ते मुंबईहून जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे नातेवाईकांकडे आले होते. दोन बालकांसह सात जणांना कोरोना असल्याचे समोर आले होते. यातील ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला.

दरम्यान, नगर जिल्ह्यातील पिंपळगाव येथील मूळ रहिवासी असलेले सातजण मुंबईत होते. नगर सध्या कोरोना रिस्क जिल्हा आहे. त्यामुळे सेफ असलेल्या बीड जिल्ह्यातील सांगवी (ता. आष्टी) येथील पाहुण्यांकडे येण्याचा त्यांनी पास मिळविला. त्याद्वारे १३ तारखेला जिल्ह्यात आलेल्या या सातजणांना सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळली. अखेर त्यांना कोरोना असल्याचे निष्पन्न झाले. 

हेही वाचा - देश लॉकडाऊन न करताही कोरोनाशी लढा, वाचा या देशाची कहाणी...

गावे बफर झोन म्हणून घोषित
आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे कोरोना विषाणूची लागण झालेले सात रुग्ण आढळून आले आहेत. बीड जिल्ह्यात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून फौजदारी प्रकिया दंड संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार या गावापासून तीन किलोमीटर परिसरातील आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण या गावापासून तीन किलोमीटर परिसरातील (सांगवी पाटण, खिळद, पाटण, कोहीनी, कारखेलतांडा ) हा परिसर कन्टेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात येत आहे. त्यापुढील चार किलोमीटर परिसरातील लिंचोडी, धामणगाव, सुर्डी, कारखेल बु., डोईठाण, वाची, लाटेवाडी व महाजनवाडी हि गांवे बफर झोन म्हणून घोषित करण्यात येत आहेत. ही सर्व गावे व परिसर पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्ण वेळ बंद करण्यात येऊन संचारबंदी लागू करण्यात येत आहे.

हेही वाचा - अमेरिकेतील नोकऱ्या धोक्यात, पण हे क्षेत्र तारणार...  

सहवासातील ५६ जणांचे स्वॅब तपासणीला 
इटकूर (ता. गेवराई) येथील एक व हिवरा (ता. माजलगाव) येथील एक अशा दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्या निकट सहवासातील (हायरिस्क कॉन्टॅक्ट) व इतर सहवासितांचा (लो रिस्क कॉन्टॅक्ट) शोध प्रशासनाने घेतला आहे. हिरवा येथील कोरोनाग्रस्ताच्या सहवासातील ४७ जण, तर इटकूर येथील कोरोनाग्रस्ताच्या सहवासातील नऊ अशा ५६ जणांचे थ्रोट स्वॅब रविवारी उशिरा घेऊन त्याची तपासणी सोमवारी करण्यात येणार आहे. 

२१ पथकांकडून १९७० घरांचा सर्व्हे 
कोरोना रुग्ण आढळलेल्या इटकूर (ता. गेवराई) गावाच्या परिसरातील किलोमीटर परिसरामधील इटकूर, हिरापूर, शिंपेगाव, कुंभारवाडी खामगाव, नांदूर हवेली, पारगाव जप्ती या कंटेनमेंट झोनमधील येथील कंटेनमेंट झोनमधील १२७५ घरांचा सर्व्हे रविवारी करण्यात आला. तर, हिवरा (ता. माजलगाव) परिसरातील हिवरा (बु.), गव्हाणथडी, काळेगावथडी, डुब्बाथडी, भगवाननगर या कंटेनमेंट झोनमधील गावांतील ६९५ घरांचा सर्व्हे करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com