हे तीन ॲप ठरले महत्त्वाचा दुवा : बीडमध्ये बाहेरून आलेल्या ७० हजार जणांची नोंद

Beed News
Beed News

बीड : कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सर्वात महत्त्वाच्या असलेल्या गर्दी टाळण्याच्या उपाययोजनेची कडक अंमलबजावणी करून बीडच्या जिल्हा प्रशासनाने राज्यासमोर दिशादर्शक पॅटर्न ठेवला. यात प्रशासनाने वापरलेले तीन वेगवेगळे ॲप महत्त्वाचा दुवा ठरले आहेत. ॲपमुळे होम क्वारंटाइन असलेल्यांच्या हालचालींवरही बारीक लक्ष ठेवण्यास मदत होत आहे.

दरम्यान, सर्वाधिक स्थलांतर असलेल्या या जिल्ह्यात गुरुवारपर्यंत (ता. दोन) एकही रुग्ण आढळलेला नाही.

जमावबंदी, संचारबंदी, लॉकडाऊन आदींची कडक अंमलबजावणी करण्यात जिल्हा अव्वल ठरला. त्याचबरोबर सर्वाधिक स्थलांतर असलेल्या या जिल्ह्यात या काळात परतणाऱ्यांचा लोंढा वाढला. अशांची जागच्या जागीच पाहणी आणि माहिती गोळा करण्याचे काम झाले. त्यामुळे प्रशासनाला भविष्यातील लढाईही सोपी जाणार आहे. यात सर्वात महत्त्वाचा ठरला तो तीन ॲपचा वापर. 

या तीन ॲपचा वापर 

पुणे, मुंबई व अन्य जिल्ह्यांसह विदेशातून परतणाऱ्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना काही लक्षणे आढळली तर या सर्व बाबींची नोंद करण्यासाठी ‘Covid - १९ Beed EASY app’, ‘Covid - १९ Cobo’ व ‘Home Quarantine monitoring’ हे तीन ॲप वापरण्यात आले. 

ॲपचा असा वापर व फायदा 

जिल्ह्याबाहेरून येणाऱ्यांची पोलिस, आरोग्य कर्मचारी, शिक्षकांमार्फत १४ चेकपोस्टवर पाहणी झाली. संबंधिताने कुठे कुठे प्रवास केला, काही लक्षणे आहेत का आदी सर्व नोंदी Covid - १९ Easy ॲपवर भरल्या. यामध्ये परदेशातून आलेल्या ७४ जणांचाही समावेश आहे. त्यामुळे अशांना होम क्वारंटाइन करण्यास मदत झाली.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

साधारण ७० हजार जणांची या ॲपमध्ये नोंद झाली. लक्षणे आढळलेल्यांची तपासणी, विलगीकरण कक्षात ठेवून स्वॅब नमुने घेण्यात आले. Covid १९ Cobo हे ॲप सरकारी डॉक्टरांना देण्यात आले. त्यांच्याकडे आलेल्या, कोरोनासदृश लक्षणे आढळलेल्या तीन हजार जणांची नोंद यात घेण्यात आली. 

सर्वात महत्त्वाचे ॲप ठरले ते Home Quarantine Monitoring. यामध्ये होम क्वारंटाइन केलेल्यांची नोंद आहे. त्याचे मॉनिटरिंग प्रत्येक तालुका आरोग्य अधिकारी, तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका ठिकाणी आहे. संबंधिताने थोडीही हालचाल केली तरी त्याचे लोकेशन मॉनिटरिंग करणाऱ्यांना मोबाईलमध्ये दिसते. विशिष्ट ट्युनही वाजते. त्यामुळे होम क्वारंटाइन केलेल्यांवर २४ तास बारीक नजर राहत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com