esakal | कोरोना : रंगपंचमीसाठी बाजारात आलेल्या रंग, पिचकाऱ्यांबद्दल काय सल्ला आहे
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad news

देशभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. भारतातही कोरोनाची भीती सर्वांमध्ये आहे. चीनमधून आलेला या व्हायरसचा रंगपंचमीवरही परिणाम होणार आहे.

कोरोना : रंगपंचमीसाठी बाजारात आलेल्या रंग, पिचकाऱ्यांबद्दल काय सल्ला आहे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : देशभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. भारतातही कोरोनाची भीती सर्वांमध्ये आहे. चीनमधून आलेला या व्हायरसचा रंगपंचमीवरही परिणाम होणार आहे. रंगपंचमीला चीनमधून आयात केलेले कलर अधिकांश वापरले जातात. त्यामुळे रंगपंचमीला रंग खेळू नका, असे आवाहन करणारे संदेश सध्या व्हाट्सअप फेसबुकवर सर्वत्र व्हायरल होत आहेत.

देशभरात मंगळवारी (ता.दहा) रंगपंचमी साजरी होणार आहे. या दिवशी एकमेकांना रंग लावून हा सण साजरा केला करण्यात येतो. महाराष्ट्रात या सणाचे विशेष महत्त्व आहे. या सणाला यंदाही जोरदार तयारी सुरू आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर फिरत संदेशामुळे रंगपंचमीसाठी रंग घ्यावा की नाही, या संभ्रमात सध्या नागरिक आहेत.

बाजेवर टाकून आणले मायलेकीचे मृतदेह  

गेल्या काही वर्षापासून इकोफ्रेंडली रंगपंचमी साजरी करण्यातचा ट्रेंड आला आहे. त्यामुळे पाण्याची बचत होत आहे. रंगपंचमीसाठी लागणारे रंगही चीनमधून आयात केले जात असल्याची माहिती या संदेशांत आहे. यामुळे रंगपंचमी ही पळसाच्या फुलापासून तयार केलेल्या रंग वापरावेत. नैसगिक रंगाना प्राधान्य द्यावे, असेही सुचवले जात आहे. 

काय आहे सोशल मीडियावरील मेसेज 

मित्रांनो, यंदा कोरोना वायरस चायना देशातून इतर देशात पसरत आहे. कोरोना वायरसमुळे हजारो माणसे मृत्यूमुखी पडली आहेत. तसेच ह्या आजारावर लस शोधण्यात अजूनही शास्त्रज्ञांना यश आले नाही. म्हणून सर्वत्र भयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

इकडे आईचं सरण पेटलं आणि तिकडे...

आता होळी हा सण जवळ येत आहे. होळीचे कलर फुगे, आणि कलर चायना मधूनच येते. त्यामुळे आपल्यालाही कोरोना वायरसची लागण होऊ शकते. एका दिवसाच्या मजेसाठी आयुष्य धोक्यात घालू नका. कलर आपण पुढच्या वर्षी देखील खेळू शकतो. आपल्या प्रियजनांची काळजी आपणच घेतली पाहिजे. म्हणून यंदा रंगांपासून लांबच राहावे. हा मेसेज तुमच्या प्रियजनांना, मित्रांना आणि इतरांनाही पाठवावा, ही विनंती. 

या व्हायरल संदेशाचा किती परिणाम होतो, ते पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. 

मराठवाड्यातील हा किल्ला तुम्हाला माहित नसणारच