नववधू-वराचे घरातच ‘सात फेरे’ ऑनलाईन टाकल्या अक्षता,सर्वत्र होतेय कौतुक

सुशांत सांगवे
Saturday, 2 May 2020

लग्न सोहळा हा सहसा एखाद्या मंगल कार्यालयात होतो किंवा एखाद्या लाॅनवर. काहींच्या लग्न सोहळ्याला शेकडो तर काहींच्या लग्न सोहळ्याला हजारो लोक उपस्थित राहतात. पण, हा भपकेबाजपणा टाळून लातूरात शनिवारी (ता. २) एक विवाह सोहळा झाला.

लातूर : लग्न सोहळा हा सहसा एखाद्या मंगल कार्यालयात होतो किंवा एखाद्या लाॅनवर. काहींच्या लग्न सोहळ्याला शेकडो तर काहींच्या लग्न सोहळ्याला हजारो लोक उपस्थित राहतात. पण, हा भपकेबाजपणा टाळून लातूरात शनिवारी (ता. २) एक विवाह सोहळा झाला.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

विशेष म्हणजे हा विवाह चक्क राहत्या घरात पार पडला. या सोहळ्याला दोन्ही पक्षाकडील केवळ २० वऱ्हाडी हजर होते. कोरोनामुळे अशाप्रकारे अत्यंत साधेपणाने आणि सर्व नियमांचे पालन करत विवाह सोहळा साजरा करून लातूरातील पाटील आणि चिल्ले या कुटूंबियांनी नवा आदर्श घालून दिला.

कोरोनामुळे आणि कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी लागू झालेल्या संचारबंदीमुळे लग्न सोहळे कसे करायचे, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. काहींनी मार्च आणि एप्रिल महिन्यातील लग्न सोहळे पुढे ढकलले. पण, टाळेबंदी नेमकी कधीपर्यंत राहणार आहे, हे निश्चित नाही. त्यामुळे लातूरातील पाटील आणि चिल्ले या कुटूंबियांनी गर्दी न जमवता घरातच विवाह सोहळा साजरा करायचा, असा निर्णय घेतला.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठीक्लिक करा

या निर्णयाला माधवराव पाटील यांच्या कन्या रेणूका (वधू) आणि रमेश चिल्ले यांचे पुत्र प्रतिक (वर) यांनीही होकार दर्शवला. त्यामुळे या सोहळ्यासंदर्भात तहसीलदारांकडून आवश्यक परवानगी घेण्यात आली. माधवराव पाटील म्हणाले, जवळपास दोन महिन्यांपूर्वीच लग्न ठरले होते. त्यानंतर लग्नाची तारीख, स्थळ ठरवले. लग्नपत्रिकाही छापून तयार ठेवण्यात आल्या होत्या. पण त्यानंतर लगेचच टाळेबंदी जाहीर करण्यात आली.

गर्दी जमवता येणार नाही, असेही सांगण्यात आले. पण, टाळेबंदी नेमकी किती दिवस आहे, हे कोणालाही सांगता येत नाही. म्हणून आम्ही घरातच लग्न सोहळा आयोजित केला. मास्क बांधणे, सुरक्षित अंतर राखणे, सॅनिटायझरचा वापर करणे, गर्दी न करणे या प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करतच हा सोहळा अत्यंत साधेपणाने आणि घरगुती वातावरणात साजरा केला. लग्नाचा खर्च टाळून नव दाम्पत्यांनी गरजूंना अत्यावश्यक वस्तूंची मदतही केली.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

अक्षता टाकल्या व्हीडिओ क्लॉलिंगवरून

कोरोनामुळे आम्ही आमच्या मुलांचा विवाह घरातच साजरा करत आहोत. इच्छा असूनही आपल्याला या सोहळ्याला आम्हाला बोलावता येत नाही. त्यामुळे आपण आपल्या घरातूनच नव दाम्पत्यांला शुभाशिर्वाद द्यावेत, असा विंनती करणारा एमएमएस आम्ही नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना पाठवला.

त्यांनीही या निर्णयाचे कौतूक करत आपापल्या घरातून आशिर्वाद दिले. जवळच्या नातेवाईकांना हा विवाह सोहळा आम्ही व्हीडिओ क्लॉलिंगच्या माध्यमातून दाखवला. त्यांनीही व्हीडिओ क्लॉलिंगवरूनच घरबसल्या अक्षता टाकल्या. यात परदेशातील नातेवाईकांचाही समावेश होता, अशी माहिती रमेश चिल्ले यांनी दिली. पूर्वी लग्न सोहळे घरातच व्हायचे, असेही चिल्ले यांनी आवर्जून सांगितले.

CoronaVirus Effect Marriage at home Latur News


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CoronaVirus Effect Marriage at home Latur News