esakal | Coronavirus : लातुरातील भाजप आमदाराला कोरोनाची बाधा
sakal

बोलून बातमी शोधा

MLA's Corona Test Report Positive in Latur

भारतीय जनता पक्षाच्या काही आमदारांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यापाठोपाठ आता लातूर जिल्ह्यातील भाजपच्या एका आमदाराला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती पुढे आली आहे.

Coronavirus : लातुरातील भाजप आमदाराला कोरोनाची बाधा

sakal_logo
By
सुशांत सांगवे

लातूर : जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या एका आमदाराला कोरोनाची लागण झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर लातुरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती ठीक असल्याचे येथील डॉक्टरांनी जाहिर केले.

कोरोनाचा फैलाव रोखता यावा म्हणून जनतेत सहभागी होणाऱ्या पोलीस अधिकारी, डॉक्टर यांच्या पाठोपाठ आता राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याआधी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली होती.

याशिवाय, भारतीय जनता पक्षाच्या काही आमदारांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यापाठोपाठ आता लातूर जिल्ह्यातील भाजपच्या एका आमदाराला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती पुढे आली आहे.

बहिणीच्या जीवासाठी ती सहन करायची बलात्कार, एकदा केमिकल कंपनीजवळ त्याने बोलावले अन..

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत लातूर शहर आणि जिल्ह्यातील 220 व्यक्तींचे स्वॅब आज (ता. 7) तपासणीसाठी आले होते. यापैकी तब्बल 159 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 40 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 20 जणांचे अहवाल अंतिम आले नाहीत तर 1 अहवाल रद्द करण्यात आला आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेले लातूरमधील 21, उदगीरमधील 3, अहमदपूरमधील 5, निलंगा येथील 2, औसा येथील 8, कासारशिरसीतील 1 असे रुग्ण आहेत. यात आमदार, त्यांचा मुलगा आणि भाचा यांचा समावेश आहे. 

आई आजारी, भावांचाही सांभाळ, कर्ता बनून आठवीतली शीतल देतेय कुटूंबाला आधार
 

लातूर : कोरोना मीटर
 

  • एकूण बाधित : 546
  • उपचार सुरू असलेले : 222
  • बरे झालेले : 298
  • एकूण मृत्यू : 26