लातूर : उदगीरला पुन्हा हादरा, लोणीतील एकाचा कोविडने मृत्यू

युवराज धोतरे
शनिवार, 23 मे 2020

उदगीर येथील शासकीय रुग्णालयात शुक्रवारी दुपारी दोन वाजता लोणी येथील ज्येष्ठ नागरिक उपचारासाठी दाखल झाला होता. या रुग्णाला कोरोना सदृश्य लक्षणे दिसल्याने नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.

उदगीर (जि. लातूर) : लोणी (ता. उदगीर) येथील एका ७८ वर्षीय व्यक्तीचा उपचार चालू असताना कोरोना सदृष्य आजाराने शुक्रवारी (ता.२२) मृत्यु झाला होता. मृत्यूनंतर या व्यक्तीचा स्वॅब घेलून तपासणीसाठी लातूरला पाठवण्यात आला होता. त्याचा अहवाल शनिवारी (ता.23) रात्री प्राप्त झाला असून हा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतिष हरिदास यांनी दिली आहे.

उदगीर येथील शासकीय रुग्णालयात शुक्रवारी दुपारी दोन वाजता लोणी येथील ज्येष्ठ नागरिक उपचारासाठी दाखल झाला होता. या रुग्णाला कोरोना सदृश्य लक्षणे दिसल्याने नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. हा व्यक्ती सुरुवातीपासून इतर अनेक आजाराने त्रस्त होते. त्यात 78 वर्षे वय होते.रूग्णालयात दाखल झाल्यानंतर अवघ्या एक तासातच या
व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या बाबत कोरोना रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ शशिकांत देशपांडे यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद केली आहे. 

मानलं बुवा - शिक्षण बारावी, हाताखाली वीस इंजिनिअर अन् टर्न ओव्हर... 

या रुग्णाचा मृत्यू नेमका कशाने झाला हे  स्पष्ट झाले नव्हते.या रुग्णाला कोरोना सदृश्य लक्षणे दिसत होती. त्यामुळे रुग्णाचा मृत्यु सारी आजाराने झाला की कोरोनाने यासाठी या व्यक्तीचा स्वॅब घेऊन तपासणीसाठी लातूरला पाठविण्यात आला होता.

घाबरू नका - तब्बल नव्वद टक्के रुग्ण ठणठणीत बरे होणार 

उदगीर मधील वाढत्या कोरोना रुग्णाच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर या मृत्यूमुळे उदगीरकराच्या चिंततेत भर पडली आहे. पहिल्या दिवशी शहरातील एक 70 वर्षे महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला व एक तासाभरातच त्या महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर एका 68 वर्षीय व्यक्तीचा कोरोणाची लागण झाल्याने दुसरा बळी गेला होता. लोणी येथील नागरिकांचा हा तिसरा बळी गेला आहे. या व्यक्तीला नेमका संसर्ग झाला कसा? याबाबत आरोग्य यंत्रणा शोध घेत असून या व्यक्तीच्या संपर्कात आलेले कुटुंबीय व नातेवाईक या सर्वांची तपासणी करण्यात येणार आहे. शिवाय या मृत व्यक्तीचे घर परिसर सील करण्यात येणार असून हा नवा रेडझोन तयार होणार आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus patient dies in Udgeer