esakal | गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर लातूरला चांगली बातमी, `त्या` महिलेसह लातूरचे सर्व अहवाल निगेटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

latur news

अहवाल निगेटिव्ह यावा, यासाठी सर्वजण देव पाण्यात ठेऊन होते. सर्वांनाच या महिलेच्या अहवालाचा ताण आला होता. यामुळे कधी नव्हे ती अहवालाची प्रतीक्षा सुरू झाली. महिलेच्या लक्षणाबाबत जिल्ह्यात चर्चा घडून आल्याने सर्व घटकांकडून विचारणा होऊ लागली. बुधवारी रात्री उशिरा या महिलेसह दहा जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर यंत्रणेतील अधिकाऱ्यांना शांत झोप लागली.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर लातूरला चांगली बातमी, `त्या` महिलेसह लातूरचे सर्व अहवाल निगेटिव्ह

sakal_logo
By
विकास गाढवे

लातूर : येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेने दोन दिवसात दहा संशयित रूग्णांच्या घशातील द्रावाचे नमुने (स्वॅब) पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू आरोग्य प्रयोगशाळेकडे (एनआयव्ही) तपासणीसाठी पाठवले होते. यात एका कोरोनाबाधित रूग्णांच्या सहवासात आलेल्या महिलेच्या स्वॅबचाही समावेश असल्याने सर्वांनाच ताण आला होता.

मात्र, या महिलेसह सर्व दहा रूग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. प्रयोगशाळेने बुधवारी (ता. २५) गुढीपाडव्याच्या महुर्तावर रात्री उशिरा ही बातमी दिल्यानंतर आरोग्य यंत्रणेसह प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला. 

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय ढगे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. यात प्रवास करून आलेल्या रूग्णांसह संशयितांवर आरोग्य विभागाची पाळत आहे. संसर्ग रोखण्यासाठी या रूग्णांची तपासणी करून लक्षणे आढळून आलेल्यांचे स्वॅब पुण्याच्या एनआयव्हीकडे पाठवण्यात येत आहे. 

इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा  

परदेशातून आलेले प्रवाशी तसेच पुणे व मुंबईहून आलेल्या प्रवाशांचीही तपासणी केली जात आहे. दोन दिवसापू्र्वीपर्यंत अशा ३२ रूग्णांचे स्वॅब घेण्यात आले होते. या सर्व रूग्णांच्या स्वॅबचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे प्रशासकीय यंत्रणेने बळ मिळाले होते. जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रूग्ण नसल्याने यंत्रणेने संसर्ग रोखण्याच्या उपाययोजनांची व्याप्ती वाढवली होती. यातच मंगळवारी (ता. २४) पुण्याहून आलेल्या एका महिलेला कोरोनाची लक्षणे आढळून आली. 

ही महिला कोरोनाबाधित रूग्णायाच्या सहवासात आली होती. यामुळे आरोग्य यंत्रणेची पाचावर धारण बसली. या महिलेच्या निमित्ताने जिल्ह्यात कोरोनाधित रूग्णाचा प्रारंभ होतो की काय, असे वाटून तोंडचे पाणी पळाले होते. या महिलेसह अन्य नऊ रूग्णांचेही स्वॅब घेण्यात आले होते. मात्र, या महिलेच्या अहवालाकडेच सर्वांचे लक्ष लागले होते. 

संताप येईल तुम्हाला ही बातमी वाचाल तर...

अहवाल निगेटिव्ह यावा, यासाठी सर्वजण देव पाण्यात ठेऊन होते. सर्वांनाच या महिलेच्या अहवालाचा ताण आला होता. यामुळे कधी नव्हे ती अहवालाची प्रतीक्षा सुरू झाली. महिलेच्या लक्षणाबाबत जिल्ह्यात चर्चा घडून आल्याने सर्व घटकांकडून विचारणा होऊ लागली. बुधवारी रात्री उशिरा या महिलेसह दहा जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर यंत्रणेतील अधिकाऱ्यांना शांत झोप लागली.

loading image