नागरिकांच्या आरोग्यासाठी नगरसेवक सरसावले

धनंजय देशपांडे
Saturday, 28 March 2020

पाथरी (जि.परभणी) येथे संचारबंदीत ही आपापल्या प्रभागात सोडियम हायफो क्लोराईडची फवारणीसह स्वच्छता राखण्यासाठी पुढाकार घेत आहेत.

पाथरी (जि.परभणी) : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर नागरिक घरात बसून असल्याने त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नगरसेवक सरसावले असून संचारबंदीत ही आपापल्या प्रभागात सोडियम हायफो क्लोराईडची फवारणीसह स्वच्छता राखण्यासाठी पुढाकार घेत आहेत.
  कोरोना व्हायर्सने जगभरात धुमाकूळ घातला आहे. यामुळे मोठ्यासंख्येने जीवितहानी झाली असल्याने देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शासनाच्या वतीने या विषाणूला रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्याच अनुषंगाने पाथरी नगर परिषदेच्या वतीने गुरुवारी (ता.२६) शहरात सोडियम हायफो क्लोराईडची फवारणी करण्यास सुरुवात केली आहे. 

हेही वाचा - ‘सकाळ’मुळे आई-मुलाची झाली भेट

 झाडझुड, पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न
संचारबंदीमुळे नागरिक घरात बसून असल्याने नगरसेवक तत्परतेने नागरिकांच्या समस्या सोडवत आहेत. नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी नगरसेवक स्वतः लक्ष घालून प्रभाग स्वच्छतेची काळजी घेत आहेत. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर आपल्या प्रभागात सोडियम हायफो क्लोराईडची फवारणी करून घेण्यासाठी नगरसेवक स्वतः जातीने लक्ष देत आहेत. गटनेते जुनेद खान दुराणी, नगराध्यक्षा मीनाताई भोरे, उपनगराध्यक्ष हनान खान दुर्राणी, स्वच्छता सभापती शेख इरफान यांच्या सहकार्याने सर्व नगरसेवक रोजची झाडझुड व पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. नगरसेवक संचारबंदीत ही नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देत असल्याचे चित्र पाथरी शहरात पहावयास मिळत आहे.

 हेही वाचा - बेघरांसाठी भाजपचे ‘कम्युनिटी किचन’

 ‘कोरोना सेफ्टी पाथरी’ टी-शर्ट वाटप
संचारबंदीच्या काळात  कर्मचाऱ्यांना ओळखण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने पाणीपुरवठा, स्वच्छता, अग्निशामकदल आणीबाणी व  विद्युत विभागा सारख्या अत्यावश्यक सेवेत काम कारणाऱ्या कर्मचाऱ्यांना ‘कोरोना सेफ्टी पाथरी’ टी-शर्ट वाटप करण्यात आले आहे.
- जुनेद खान दुर्राणी, गटनेता, पाथरी

हेही वाचा ....

नवीन ग्रामीण रुग्णालय 
सोनपेठ येथे सुरु करा : आमदार वरपूडकर

परभणी : सोनपेठ (जि.परभणी) येथील ग्रामीण रुग्णालयासाठी तातडीने १०० खांटाची मान्यता देवून तातडीने हे रुग्णालय सुरु करावेत, अशी मागणी पाथरीचे आमदार सुरेश वरपुडकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.
सध्या देशात ‘कोरोना’ मुळे संपूर्ण जग हतबल झालेले आहे. तीच परिस्थिती महाराष्ट्रात आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व  आरोग्य मंत्री राजेश टोपे राज्याची सध्याची परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळत आहेत. पाथरी मतदार संघातील सोनपेठ तालुक्यात १०० बेडच्या नवीन ग्रामीण रुग्णालयाचे नुकतेच बांधकाम झाले आहे. परंतू रुग्णालयाचे उदघाटन झालेले नाही. परिणामी या दवाखान्यासाठी लागणारे डॉक्टर, नर्स, परिचर आदी कर्मचारी तसेच कोणत्याही मशिनरी, फर्निचर, पलंग आदी सुविधा अद्याप आलेल्या नाहीत. कोरोना या साथीच्या आजारामुळे तालुक्यातील लोक हतबल झालेले आहेत. सोनपेठ तालुक्यातील लोकांच्या भविष्यातील अडचणीचा विचार करून ग्रामीण रुग्णालय सोनपेठ येथे तत्काळ डॉक्टरांची संख्या वाढवून या ठिकाणी १०० खाटा व इतर आवश्यक असणारी मशनरी व साहित्य त्वरित पाठवावे. ग्रामीण रुग्णालय सुरु करावे अशी विनंती परभणी जिल्हा काँग्रेस कामिटीचे अध्यक्ष आमदार सुरेश वरपूडकर यांनी लेखी स्वरुपात पत्राद्वारे महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना केले आहे. तसेच परभणी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना सुद्धा कळविले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Councilor for the well being of the citizens