कोर्टाच्या आवारात साजरा केला वाढदिवस अन् ११ वकिलांवरच झाला गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 July 2020

फिजीकल डिस्टन्सींग, जमावबंदी आदी उपाय योजनांचे उल्लंघन केल्या प्रकरणी शहरातील ११ वकिलांवर गुन्हा नोंद करण्यात आला. न्यायालय आवारात वाढदिवस साजरा केल्यावरुन शिवाजी नगर पोलिस ठाण्यात हा गुन्हा नोंद करण्यात आला. 

बीड : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याच्या उद्देशाने आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या फिजीकल डिस्टन्सींग, जमावबंदी आदी उपाय योजनांचे उल्लंघन केल्या प्रकरणी शहरातील ११ वकिलांवर गुन्हा नोंद करण्यात आला. न्यायालय आवारात वाढदिवस साजरा केल्यावरुन शिवाजी नगर पोलिस ठाण्यात हा गुन्हा नोंद करण्यात आला. 

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  
 

घडला प्रकार असा 
जिल्हा वकिल संघाच्या माजी पदाधिकाऱ्याचा मंगळवारी (ता.सात)  वाढदिवस साजरा करण्यावरुन शिवाजी नगर पोलिस ठाण्याचे फेरोज पठाण यांनी फिर्याद दिली.

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!

यावरुन ऍड. प्रविण राख, ऍड. अविनाश गंडले, ऍड. भिमराव चव्हाण, ऍड. प्रभाकर आंधळे, ऍड. उद्धव रासकर, ऍड. श्रीकांत साबळे, ऍड. गोवर्धन पायाळ, ऍड. विकास बडे, ऍड. श्रीकांत जाधव, ऍड.. विनायक जाधव, ऍड. रोहिदास येवले यांच्या विरोधात बुधवारी (ता. आठ) हा गुन्हा नोंद करण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Court zone advocate celebrate birthday against case file