
लातूर : जिल्ह्यात कोरोनाचा उपचार सुरु असताना एकाचा मृत्यू झाला. यामुळे एकूण मृत्यूचा आकडा ६७४ वर गेला आहे. जिल्ह्यात सारसा येथील ५५ वर्षीय व्यक्तीचा कोरोनाचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. दरम्यान मंगळवारी (ता.२९) जिल्ह्यात २६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात ६६७ जणांच्या आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आल्या.
त्यापैकी ९ जणांना कोरोनाची लागण झाली. तर ४८६ जणांच्या ॲन्टीजेन टेस्ट केल्या होत्या. त्यापैकी १७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे एकूण बाधितांचा आकडा २२ हजार ९५५ वर गेला आहे. यापैकी २१ हजार ९७१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर ३१० जणांवर उपचार सुरु आहेत.
लातूर कोरोना मीटर
......
एकूण बाधित--२२९५५
उपचार सुरु असलेले-- ३१०
बरे झालेले --२१९७१
मृत्यू--६७४
(आजचे पॉझिटिव्ह २६, आजचे मृत्यू--एक)
Edited - Ganesh Pitekar