
लातूर जिल्ह्यात शुक्रवारी (ता. १८) कोरोना बाधितांच्या संख्येत ३४ ने वाढ झाली आहे.
लातूर : जिल्ह्यात शुक्रवारी (ता. १८) कोरोना बाधितांच्या संख्येत ३४ ने वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या आता २२ हजार ५५१ वर गेली आहे.जिल्ह्यात १९० जणांच्या आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आल्या. त्यापैकी २२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
तसेच २५१ जणांच्या ॲंटीजेन टेस्ट झाल्या. यात १२ जणांना कोरोना लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे एकूण बाधितांची आकडा २२ हजार ५५१ वर गेला आहे. यात ६६७ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३७३ जणांवर उपचार सुरू असून २१ हजार ५११ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
लातूर कोरोना मीटर
एकूण बाधित ः २२,५५१
उपचार सुरू असलेले ः ३७३
बरे झालेले ः २१५११
मृत्यू ः ६६७
Edited - Ganesh Pitekar