उस्मानाबाद जिल्ह्यात ५७ कोरोना रुग्ण, तिघांचा मृत्यू

तानाजी जाधवर
Sunday, 18 October 2020

उस्मानाबाद  जिल्ह्यामध्ये रविवारी (ता.१८) नवीन ५७ कोरोनाबाधिताची भर पडली आहे.

उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये रविवारी (ता.१८) नवीन ५७ कोरोनाबाधिताची भर पडली आहे. तीन रुग्णांचा मृत्यु झाला. १०८ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आतापर्यंत १२ हजार ४५५ कोरोनाबाधित बरे होऊन गेले आहेत. जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. आता ९०.०१ टक्के आहे. तीन रुग्णाचा मृत्यु झाल्याने त्याचाही दर वाढला असून ३.२६ टक्के एवढा मृत्युदर झाला आहे.

शरद पवारांच्या दौऱ्यात आमदार चौगुले यांची सोनसाखळी चोरट्यांनी लांबवली

आजपर्यंत जिल्ह्यामध्ये ७१ हजार ६०६ लोकांची तपासणी झाली. त्यातील १३ हजार ८३७ इतके रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात कोरोना होण्याचे प्रमाण १९.३२ टक्के इतके आहे. जिल्ह्यामध्ये वाढलेल्या ५७ रुग्णांचा विचार केला तर उस्मानाबादमध्ये २३, तुळजापुर आठ, उमरगा दोन, लोहारा शून्य, कळंब आठ, वाशी तीन, भुम आठ व परंडा पाच अशी तालुकानिहाय रुग्ण आढळले आहेत. यामध्ये १३१ जणाचे स्वॅब घेऊन प्रयोगशाळेमध्ये पाठविण्यात आले होते. त्यातील १३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर ३४७ जणांची अँटिजेन टेस्ट केल्यानंतर ३६ जणांना बाधा झाल्याचे दिसून येत आहे.

तीन जणांचा मृत्यू
भुम तालुक्यातील ईट येथील ५३ वर्षीय पुरुषाचा जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यु झाला. उस्मानाबाद शहरातील गणेशनगर भागामध्ये राहणाऱ्या ६९ वर्षीय महिलेचा जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. उस्मानाबाद शहरातीलच ७२ वर्षीय महिलेचा सोलापूर येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे.

भूकंपग्रस्तांनी व्यक्त केली शरद पवार यांच्याबद्दल कृतज्ञता; शेतकरी म्हणाले, साहेब आमचा तुमच्यावर विश्‍वास आहे

उस्मानाबाद कोरोना मीटर
एकुण रुग्णसंख्या - १३८३७
बरे झालेले रुग्ण- १२४५५
उपचाराखालील रुग्ण- ९३१
एकुण मृत्यु - ४५१
आजचे बाधित - ५७
आजचे मृत्यु - ०३

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid Positive 57 Cases Reported In Osmanabad District