उस्मानाबाद जिल्ह्यात ५९ नवीन कोरोनाचे रुग्ण, सव्वा तीन टक्के मृत्यूदर

तानाजी जाधवर
Saturday, 17 October 2020

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये शनिवारी (ता.१७) ५९ नवीन कोरोनाबाधितांची भर पडली आहे. संख्या कमी होत असली तरी अजुनही मृत्युचे प्रमाण काही कमी होत असल्याने चिंता कायमच आहे.

उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये शनिवारी (ता.१७) ५९ नवीन कोरोनाबाधितांची भर पडली आहे. संख्या कमी होत असली तरी अजुनही मृत्युचे प्रमाण काही कमी होत असल्याने चिंता कायमच आहे. सव्वा तीन टक्के मृत्युदर असुन त्याच्यामध्ये घट आल्याशिवाय परिस्थिती नियंत्रणात येणार नसल्याचे चित्र आहे. शनिवारी दोन जणांचा मृत्यु झाला असून १०३ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने समाधानाची बाब आहे.

पालकमंत्री गडाखांनी शेतकऱ्यांसमवेत बांधावरच घेतली बैठक, अधिकाऱ्यांना घेतले बोलवून

आतापर्यंत १२ हजार ३४७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर मृत्युचा आकडा ४४८ इतका झाला आहे. कोरोना बरे होण्याचे प्रमाण ८९.६० टक्के इतके झाले आहे. तर कोरोना होण्याचे प्रमाण जिल्ह्यामध्ये १९.५४ टक्के एवढे आहे, ७० हजार ५०९ रुग्णांच्या तपासणीनंतर जिल्ह्यामध्ये १३ हजार ७८० जणांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद आहे.

शनिवारी आलेल्या ५९ नवीन रुग्णामध्ये २२ जण आरटीपीसीआरद्वारे पॉझिटिव्ह आले आहेत. ३७ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. उस्मानाबाद तालुक्यामध्ये १८, तुळजापुर १०, उमरगा सात, लोहारा शुन्य, कळंब १३, वाशी आठ, भूम दोन व परंडा एक अशी नव्या रुग्णाची तालुकानिहाय आकडेवारी आहे. यावरुन रुग्णवाढीच्या बाबतीत परिस्थिती नियंत्रणात आल्याचे दिसुन येत आहे.

 

दोघांचा मृत्यु
वाशी शहरातील ६५ वर्षीय स्त्रीचा जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. तर उमरगा तालुक्यातील आष्टा जहागीर येथील ७२ वर्षीय पुरुषाचा उपजिल्हा रुग्णालयामध्ये मृत्यु झाला आहे.

उस्मानाबाद कोरोना मीटर -
एकुण रुग्णसंख्या - १३७८०
बरे झालेले रुग्ण - १२३४७
उपचाराखालील रुग्ण- ९८५
एकुण मृत्युसंख्या - ४४८
आजचे बाधित - ५९
आजचे मृत्यु - ०२

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid Positive 59 New Cases Recorded In Osmanabad District