esakal | आई भवानीचा उदो उदो ! तुळजाभवानी मंदिरात नवरात्र महोत्सवास प्रारंभ 
sakal

बोलून बातमी शोधा

TULJABHAVANI MATA.jpg

पहाटे तुळजाभवानी मातेची निद्रिस्त मूर्ती सिंहासनावर आधिष्टीत करण्यात आली. सकाळी नित्योपचार पूजा झाली. त्यानंतर सकाळी अकराच्या सुमारास तुळजाभवानी मातेच्या मंदिरात कलश मिरवणूक गौमुख तीर्थापासून सुरवात झाली. तुळजाभवानी मातेच्या सिंहाच्या गाभाऱ्यात घटस्थापना झाली.

आई भवानीचा उदो उदो ! तुळजाभवानी मंदिरात नवरात्र महोत्सवास प्रारंभ 

sakal_logo
By
जगदीश कुलकर्णी

तुळजापूर : तुळजाभवानी मंदिरात शारदीय नवरात्र महोत्सवास घटस्थापनेने शनिवारी (ता. १७) प्रारंभ झाला. मंदिर समितीचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांच्या प्रमुख उपस्थिती होती. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

पहाटे तुळजाभवानी मातेची निद्रिस्त मूर्ती सिंहासनावर आधिष्टीत करण्यात आली. सकाळी नित्योपचार पूजा झाली. त्यानंतर सकाळी अकराच्या सुमारास तुळजाभवानी मातेच्या मंदिरात कलश मिरवणूक गौमुख तीर्थापासून सुरवात झाली. तुळजाभवानी मातेच्या सिंहाच्या गाभाऱ्यात घटस्थापना झाली. त्यानंतर येमाई, खंडोबा मंदिरात घटस्थापना करण्यात आली. मातेचे भोपे पुजारी यशराज मुकुंद कदम यांनी तुळजाभवानी मातेचे धार्मिक विधी केले. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

तुळजाभवानी मातेच्या मंदिरात घटस्थापना झाल्यानंतर श्री. दिवेगावकर आणि प्रियांका दिवेगावकर यांनी शनिवारी (ता. २४) होणाऱ्या होमासाठी २१ ब्राह्मणांना वर्णी दिली. तुळजा भवानी मंदिरात हैदराबादच्या राजा शिवराजबहाद्दूर धर्मवंत धर्मकर्ण यांच्या घराण्याच्या वतीने होणाऱ्या होमासाठी अनंत कोंडो आणि त्यांच्या पत्नी अश्विनी कोंडी यांनी ब्राह्मणांना वर्णी दिली; तसेच कोल्हापूरच्या छत्रपती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने होणाऱ्या होमासाठी प्रतीक प्रयाग आणि अंजली यांनी ब्राह्मणांना वर्णी दिली. यावेळी महंत तुकोजी बुवा, महंत वाकोजीबुवा, महंत चिलोजीबुवा, महंत हमरोजीबुवा, भोपे मंडळाचे अध्यक्ष अमर परमेश्वर, पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जनराव साळुंके, धनंजय लोंढे, उपाध्ये मंडळाचे मकरंद प्रयाग आदी उपस्थित होते. तुळजा भवानी मंदिरात केवळ २१ ब्राह्मणांना वर्णी देण्यात आली. प्रशासकीय इमारतीत अन्य ब्राह्मणांना वर्णी देण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, तहसीलदार सौदागर तांदळे, सिद्देश्वर इंतुले उपस्थित होते. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)