उस्मानाबाद : गिरवलीतील २८ वर्षीय युवकाचा कोरोनाने मृत्यू

महावीर जालन
मंगळवार, 30 जून 2020

जिल्ह्यात कोरोनाचा बारावा बळी

ईट (जि. उस्मानाबाद) : कोरोना विषाणूच्या संसर्गाने मंगळवारी (ता. ३०) एका २८ वर्षीय तरुणाचा अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला आहे. भूम तालुक्यातील कोरोनामुळे झालेला हा पहिलाच मृत्यू आहे. जिल्ह्यात कोरोनाचा हा बारावा बळी आहे. 

गिरवली (ता. भूम) येथील २८ वर्षीय तरुणाची प्रकृती खराब वाटल्यामुळे हा तरुण ईट (ता. भूम) येथील संजीवनी हॉस्पिटल या खासगी  रुग्णालयामध्ये तीन दिवस येथे उपचार घेतले. त्या ठिकाणी काहीच फरक पडला नसल्यामुळे पुढील उपचारासाठी त्याच्या भावाकडे अंबाजोगाई येथे उपचारासाठी गेला. आंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात त्याने उपचार घेतले.

आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांच्या मदतीसाठी माणुसकी धावली 

त्या ठिकाणी स्वॅब घेतल्यानंतर शुक्रवारी (ता. २६) त्याला कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्याचा  कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. त्यानंतर कोरोनाशी झुंज देताना त्याचा मंगळवारी (ता. ३०) उपचारादरम्यान मृत्यू झाला. या तरुणाचा ईट परिसरातील अनेकांशी संपर्क  असल्यामुळे मृत्यूच्या बातमी काळतच ईट परीसरामध्ये लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज : अखेर ‘त्या’ सोयाबीन उत्पादक कंपनीवर नांदेडात गुन्हा दाखल 

उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना मीटर

  • एकूण बाधित : २२०
  • बरे झालेले : १७३
  • उपचार सुरू : ३६
  • मृत्यू : १२

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: COVID-positive youth died due Dist Osmanabad