esakal | भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे अडचणीत, असे आहे प्रकरण...
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र

संगीता ठोंबरे या तालुक्यातील लहुरी येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीच्या मुख्य प्रवर्तक आहेत. तर, त्यांचे पती डॉ. विजयप्रकाश ठोंबरे या सूतगिरणीचे अध्यक्ष आहेत. केज प्रथमवर्ग न्यायालयाने दिलेला आदेश अंबाजोगाईच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने कायम ठेवला आहे.

भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे अडचणीत, असे आहे प्रकरण...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बीड - माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्यासह पतीवर न्यायालयाच्या आदेशाने फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला होता. केज प्रथमवर्ग न्यायालयाने दिलेला आदेश अंबाजोगाईच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने कायम ठेवला आहे.

 बनावट स्वाक्षऱ्या करून लोकनेते गोपीनाथराव मुंडे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीच्या संचालक पदावर आपली नेमणूक केल्याच्या कथित संचालक गणपती कांबळे यांच्या फिर्यादीवरुन माजी आमदार संगीता ठोंबरे व त्यांचे पती डॉ. विजयप्रकाश ठोंबरे यांच्याविरोधात फसवणुकीसह इतर गुन्हे नोंद करून चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश केजच्या न्यायालयाने दिले होते.

हेही वाचा - आमदारांच्या सासऱ्याचे उपोषण अन तलाठ्यांचे निलंबन...

संगीता ठोंबरे या तालुक्यातील लहुरी येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीच्या मुख्य प्रवर्तक आहेत. तर, त्यांचे पती डॉ. विजयप्रकाश ठोंबरे या सूतगिरणीचे अध्यक्ष आहेत. कथीत संचालक गणपती सोनाप्पा कांबळे यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून संचालक पदावर नियुक्ती केल्याची त्यांची तक्रार आहे. सदर व्यवहारात श्रीमती ठोंबरे व पती विजयप्रकाश ठोंबरे यांनी आपल्या खोट्या स्वाक्षऱ्या करून शासनाची व जनतेची फसवणूक करून आपणास नाहक गोवण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा - शेतकरी म्हणतो, साहेब मी जिवंत....अधिकारी म्हणतात मेला

सदर आर्थिक व्यवहारात आपला काही एक संबंध नसून पुराव्यादाखल त्यांनी आपल्या खोट्या सह्या केल्याचा फॉरेन्सिक तज्ज्ञ अश्विनी पवार यांचा अहवाल आणि शपथपत्र जोडून तक्रार दिली होती. यावरून केजच्या प्रथमवर्ग न्यायालयाने संगीता ठोंबरे व विजयप्रकाश ठोंबरे यांच्याविरोधात फसवणुकीसह इतर कलमांन्वये गुन्हा नोंद करुन चौकशी करावी आणि अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.

हेही वाचा - कोंबड्यांमध्ये खरंच कोरोना विषाणू आहे का? नॉनव्हेजवाल्यानो, वाचा...

दरम्यान, या आदेशाच्या विरोधात ठोंबरे यांनी अंबाजोगाई येथील जिल्हा सत्र न्यायालयात स्थगिती मागितली होती.या प्रकरणात अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस. एस. सापतनेकर यांनी केज न्यायालयाचा आदेश कायम ठेवला. या प्रकरणात गणपती कांबळे यांच्या वतीने अंबाजोगाई न्यायालयात प्रवीण मेटे यांनी काम पाहिले. 

loading image