लातूरमधील व्यापाऱ्याने दिली स्वतःच्या मेहुण्याचीच सुपारी

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 6 January 2021

शहरातील एका व्यापाऱ्याला मारण्यासाठी हत्यारे घेऊन आलेल्या पाच संशयितांना चारचाकी वाहनासह सोमवारी (ता. पाच) रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले

निलंगा (जि. लातूर): शहरातील एका व्यापाऱ्याला मारण्यासाठी हत्यारे घेऊन आलेल्या पाच संशयितांना चारचाकी वाहनासह सोमवारी (ता. पाच) रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. दरम्यान, याप्रकरणी मेहुण्यानेच मेहुण्याची सुपारी दिल्याचे तपासात उघड झाले.

याबाबत निलंगा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, लातूर शहरातील जुन्या वाहनांचे व्यवहार करणारे व्यापारी उमर करीम पटेल (रा. खोरे गल्ली, लातूर) याच्या सांगण्यावरून निलंगा शहरातील त्याचे मेहुणे दिशान देशमुख (रा. दत्तनगर, निलंगा) यांच्याकडून पैसे वसूल करण्यासाठी उमर अब्दुलसाब शेख (रा. हत्तेनगर, पाच नंबर रोड, लातूर) यांच्यासह अहमद जिलानी शेख (वय २४, न्यू काझी मोहल्ला, लातूर), अखिल रहेमानसाब बिरादार (२६, इंडियानगर, गल्ली नंबर एक लातूर), विजय साहेबराव करवंजे (१६, नरसिंगनगर, इंडिया नगरजवळ, लातूर), महेश वसंत वाघमारे (२२, सुभेदार रामजीनगर लातूर), नागेश लक्ष्मण सुरवसे (२५, सुभेदार रामजीनगर, लातूर) हे पाचजण निलंगा येथे दुपारी ३.१५ वाजता शहरातील दत्तनगर पंचायत समिती कार्यालयासमोर उभा टाकले होते.

राष्ट्रवादीची सत्ता जाणार? अमित देशमुखांनी घातलं औशावर लक्ष

दिशान देशमुख (रा. दत्तनगर, निलंगा) यांच्याकडून पैसे वसूल करण्यासाठी हे पाच सुपारी किलर आले होते. खबऱ्याकडून निलंगा पोलिसांना माहिती कळताच पोलिस निरीक्षक अनिल चोरमले, शीतल सिंदाळकर, राजकुमार नागमोडे, प्रणव काळे, हणमंत पडिले यांनी फौजफाट्यासह सापळा रचून संशयितांच्या मुसक्या आवळल्या.

पती हर्षवर्धनविरोधात संजना जाधव निवडणुकीच्या रणांगणात, मुलाचे आईविरुद्ध पॅनल

त्यांच्याजवळील तीक्ष्ण हत्यारासह त्यांना अटक करून त्यांच्यावर विविध कलमान्वये निलंगा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला आहे. पैसे वसुलीच्या कारणावरून मेहुण्यानेच मेहुण्याची सुपारी दिल्याचे उघड झाले आहे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crime news latur nilanga police station killer