बीड : शहेंशाहवली दर्गाची ४०९ एकर जमिन हडपल्याचा गुन्हा

अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचाही आरोपींमध्ये समावेश
Dargah
Dargahsakal

बीड : जिल्ह्यात वक्फ आणि देवस्थानांच्या हजारो एकर जमिनी बनावट कागदपत्रांधारे हडप केल्याची प्रकरणे समोर येत असून आष्टी तालुक्यात या प्रकरणी तीन गुन्हेही दाखल झाली आहेत. आता शेहेंनशवाली दर्गाची तब्बल ४०९ एकर जमीन हडपल्याप्रकरणी भूमाफिया आणि महसुलात बड्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांविरुद्ध बुधवारी (ता. २९) शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. या प्रकरणातही तत्कालीन उपजिल्हाधिकारी प्रकाश आघावचा समावेश समोर आला आहे.(Cases of grabbing thousands of acres of temple lands by fake documents)

Dargah
नाशिक : ऑनलाइन गंडविलेले ४० हजार परत

जिल्ह्यात वक्फ बोर्डाच्या मोठ्याप्रमाणावर जमिनी आहेत. एकट्या शेहेंशवाली दर्गाची जिल्ह्यात ७९६ एकर जमीन आहे. बीडमधील काही भूमाफियांनी स्वतःला इनामदार दाखवून सदर जमिनीचे बनावट मुंतखब तयार केले, तसेच भूसुधार विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून सदर जमीन खालसा झाल्याची बनावट फाईल तयार केली. १९७८ मध्ये प्रकरण दाखल झाल्याचे भासवून तसेच १९८२ मध्ये त्याचा निकाल लागल्याचे दाखवत २०१६ मध्ये त्याचा फेर घेण्याचे आदेश काढण्यात आले. काही दिवसांपूर्वी त्याचे फेरफार देखील झाले. विशेष म्हणजे अशा प्रकारे तब्बल ४०९ एकर जमीन हडपण्यात आल्याचे जिल्हा वक्फ अधिकारी अमीनजुमा खलीखुजमा यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्या जमिनीचे त्यानंतर तिसऱ्या व्यक्तींच्या नावाने खरेदी - विक्री व्यवहारही करण्यात आले. या प्रकरणी हबीबोद्दीन सरदारोद्दीन सिद्दीकी (रा. सिडको एन १२ प्लाॅट क्र. १४, औरंगाबाद), रशीदोद्दीन सरदारोद्दीन सिद्दिकी ,कलीमोद्दीन सरदारोद्दीन सिद्दिकी (दोघेही रा. शिवाजीनगर, बीड), अशफाक गौस शेख (रा. राजीवनगर, बीड )(fake documents)

Dargah
सातारा : दंडवाढ जरुर करा; पण इतकी?

अजमतुल्ला रजाउल्ला सय्यद (रा. झमझम कॉलनी, बीड), अजीज उस्मान कुरेशी (रा. मोमीनपुरा, बीड), मुजाहिद मुजीब शेख (रा. बीड मामला, मोमीनपुरा, बीड), तत्कालीन उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील, महसूल सहायक खोड, महसूल सहायक मंडलिक (पूर्ण नावे नाहीत), तत्कालीन मंडळाधिकारी पी. के.राख, तत्कालीन तलाठी हिंदोळे (पूर्ण नाव नाही), सध्याचे तलाठी पी. एस. आंधळे, तत्कालीन तहसीलदार व इतर अधिकारी यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. दरम्यान, आतापर्यंत आष्टी तालुक्यात दाखल गुन्ह्यांत केवळ उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांनाच आरोपी करण्यात आले. मात्र यावेळी प्रथमच महसूल सहायकापासून ते तलाठी, मंडळ अधिकारी यानांही आरोपी करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.(land scam)

Dargah
रत्नागिरी : सांघिक कामाने ग्रामीण भागाचा कायापालट

हिंदू देवस्थान जमिनींचे गुन्हे कधी

दरम्यान, जिल्ह्यात आष्टीपासून परळीपर्यंत आणि गेवराई, धारुर, अंबाजोगाई व केज तालुक्यातही वक्फ व हिंदू देवस्थानच्या हजारो एकर जमिनींचे असेच बनावट दस्तऐवजाने हस्तांतर झाल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत केवळ वक्फ बोर्डाच्याच जमिनींच्या हस्तांतरण प्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. हिंदू देवस्थानांच्या जमिनीं प्रकरणी गुन्हे का दाखल होत नाहीत, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com