घटस्फोटितेनं दिला लग्नाला नकार, त्यानं घातला डोक्यातच दगड घातला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 फेब्रुवारी 2020

डोक्यात दगड घातल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या या महिलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते. 

बीड : तिनं आधीच्या नवऱ्यापासून घटस्फोट घेतला होता. एक माथेफिरू माझ्याशी लग्न कर, म्हणून तिच्या मागं लागला होता. तिनं नकार दिला, म्हणून त्यानं तिच्या डोक्यात दगड घालून खून करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली.

डोक्यात दगड घातल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या या महिलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते. 

सुनील दत्तात्रय जाधव असं या माथेफिरूचं नाव आहे. त्यानं त्या घटस्फोटित महिलेवर एकतर्फी प्रेम असल्याचा दावा करत लग्नाची मागणी केली. तिनं नकार दिल्यामुळेच एकतर्फी प्रेमातून सुनीलनं तिच्यावर जीवघेणा हल्ला केला असावा, असं पोलिसांचं म्हणणं आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

तुम्ही एलआयसी पॉलिसी काढली असेल, तर आधी हे वाचा

बीड जिल्हा हा जसा राजकारणासाठी प्रसिद्ध आहे, तसाच गुन्हेगारीसाठी कुप्रसिद्ध आहे. याच शहरात शनिवारी सायंकाळी शनिवार पेठेत ही घटना घडली. औद्योगिक वसाहतीत राहणाऱ्या 23 वर्षीय घटस्फोटितेच्या डोक्यात दगड घालून खून करण्याचा प्रयत्न झाला. 

एक वर्षांपासून छेडछाड करत होता

जखमी महिलेनं सांगितल्यानुसार एक वर्षांपासून सुनील तिच्याशी छेडछाड करत होता. यासंबंधी पूर्वीही तिनं सुनीलविरुद्ध पोलिसांकडे धाव घेतली होती. तरीदेखील तो सुधारला नाही. त्याने तिला लग्नाची मागणी घातली. त्याच्या त्रासाला कंटाळून तिला शिक्षणही अर्ध्यात सोडावे लागले होते.

मराठवाड्यातील हा किल्ला तुम्हाला माहित नसणारच

आपल्या मुलीच्या जिवाला धोका असून बीड पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणीही तिच्या वडिलांनी केली. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. पोलिसांनी सुनीलला ताब्यात घेतले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Criminal Tried To Kill A Lady Beed News