...म्हणून त्यांनी केले गुन्हेगारांच्या प्रतिमेचे दहन 

राजेभाऊ मोगल
रविवार, 8 डिसेंबर 2019

महिलांवर भरदिवसा अत्याचाराच्या घटना घडत आहेत. मात्र, गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा मिळत नाही. त्यामुळेच हैदराबाद येथील अत्याचार करणाऱ्यांना एन्काऊन्टरमध्ये मारण्यात आल्याच्या घटनेचे कौतुक होत आहे. मराठा क्रांती मोर्चातर्फे देखील गुन्हेगारांचे प्रतिकात्मक दहन करण्यात आले

औरंगाबाद - महिलांवर भरदिवसा अत्याचाराच्या घटना घडत आहेत. मात्र, गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा मिळत नाही. त्यामुळेच हैदराबाद येथील अत्याचार करणाऱ्यांना एन्काऊन्टरमध्ये मारण्यात आल्याच्या घटनेचे कौतुक होत आहे. मराठा क्रांती मोर्चातर्फे देखील गुन्हेगारांचे प्रतिकात्मक दहन करण्यात आले असून अत्याचार करणाऱ्यास भरचौकात फाशी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

देशभरात महिलांवर अत्याचाराच्या घटना कमी होण्याचे नाव घेत नाहीत. अत्याचारानंतर अत्यंत क्रुर पद्धतीने हत्या करण्यात येत आहेत. यातील आरोपींना शासनाने तत्काळ फाशीची तरतूद शासनाने केली पाहिजे. मात्र, असे होत नसल्यानेच जनता कायदा हातात घेण्याचे प्रयत्न करीत आहेत. हैदराबाद पोलीस प्रशासनाने अत्याचार करणाऱ्या चार नराधमांना यमसदनी पाठवले, याचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

वारंवार तिचे व्हॉटसऍप स्टेटस पाहणेही विनयभंग, वाचा... 

दिल्ली येथील निर्भया तसेच कोपर्डी घटनेतील आरोपींना तात्काळ फाशी दिल्या गेली असती तर अशा प्रकारच्या घटनांना आळा बसला असता. आता महिला स्वरक्षणासाठी कठोर कायदा आणि तत्काळ अंमलबजावणीसाठी आम्ही पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी समन्वयकांनी बोलून दाखविले. 

आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या युवकांचे कुटुंबिय न्यायाच्या प्रतीक्षेत  

यावेळी रेखा वाहटूळे, रेणुका सोमवंशी, ऍड. सुनिता औताडे, पल्लवी विधाते, अर्चना शितोळे, प्रियंका जुये, मीनाक्षी बरबंडे, सुकन्या भोसले, प्रभात गटकळ, सतीश वेताळ, मनोज गायके, अजय गंडे, विजय काकडे, रवींद्र वाहटुळे, संभाजी सोनवणे, सुभाष सूर्यवंशी, शिवाजी जगताप, प्रदीप हारदे, तात्याराव देवरे, गिरीश झाल्टे, गणेश मोटे, आजिनाथ बडक, गणेश साळुंखे, आदित्य म्हस्के, राहुल भोसले, बाबासाहेब गायकवाड आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Criminals Photo Burned In A Protest In Aurangabad