सरकार बदलले की पीक कर्जवाटप रखडले? (वाचा सविस्तर)

प्रकाश बनकर
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

  • जिल्ह्यात आतापर्यंत 32 लाखाचे कर्ज वाटप 
  • खरिपासाठी 588 कोटींचे कर्ज 
  • अनेकांकडेही नाहीत बियाणांसाठी पैसे 

औरंगाबाद: सततचा दुष्काळ आणि शेतमालास अत्यल्प दरामुळे शेतकऱ्यांना आसमानी व सुलतानी संकटांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पीककर्ज मोठा आधार ठरतो. परंतू बॅंकाच्या उदासिनतेमुळे शेतकऱ्यांना पीककर्जापासून वंचित रहावे लागत आहे.

यंदाच्या रब्बी हंगामासाठी आतापर्यंत जिल्ह्यात केवळ 5.25 टक्केच पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. शेतकऱ्यांची बॅंक अशी ओळख असणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने आज तारखेपर्यंत अवघे 106 शेतकऱ्यांना 32 लाख 79 रुपये म्हणजे दिलेल्या लक्षांकापैकी (0.18टक्के) एक टक्का सुद्धा वाटप झालेले नाही. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

1 ऑक्‍टोबरपासून जिल्ह्यात पीककर्ज वाटपास सुरूवात

रब्बी हंगामासाठी 1 ऑक्‍टोबरपासून जिल्ह्यात पीककर्ज वाटपास सुरूवात झाली. दोन महिन्यानंतरही पीककर्ज वाटपाची प्रतिक्रीया अत्यंत संथगतीने सुरू असल्याचे चित्र आहे. यंदा अवकाळी पावसामुळे खरीप हंगाम वाया गेला. यात रब्बीत पेरणीसाठी पैसा नसल्याने शेतकरी हताश झालेला आहे.

त्यातच नव्याने स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारकडून सरसकट कर्जमाफी होण्याची आशा शेतकऱ्यांना असल्याने अनेक शेतकऱ्यांनी पीककर्ज भरणा केलेली नाही. खासगी, सरकारी व ग्रामीण बॅंकेपेक्षा सर्वात कमी पीककर्ज वाटप जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने केले तर सर्वात जास्त सरकारी बॅंकांनी 4.34 टक्के म्हणजे 1 हजार 21 लाख 68 हजार पीक कर्जवाटप केले. रब्बीसाठी पीककर्ज वाटप होत नसल्याने शेतकरी मात्र अडचणीत सापडला आहे. 

काय घडलं बैठकीत ज्यानंतर अजित पवारांनी केलं बंड

अनेकांकडेही नाहीत बियाणांसाठी पैसे 
जिल्ह्यात नुकसानीचे पंचनामा झाले आहेत; मात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही. त्यामुळे रब्बीची तयारी कशी करावी, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. दुसरीकडे बॅंकांनीही कर्जवाटप करताना हात आखडता घेतला आहे. यामुळे शेतकरी सावकारांकडे जात आहेत. अनेकांकडे तर बियाणे घेण्यासही पैसे नाहीत. त्यामुळे सरकारी यंत्रणेने तत्काळ रब्बीसाठीचे आवश्‍यक बी-बियाणे आणि खते उपलब्ध करून देण्याची आवश्‍यकता आहे. 

- महाविकासआघाडीत 'या' मित्रपक्षाला मोठे मंत्रीपद?

खरिपासाठी 588 कोटींचे कर्ज 
खरीप हंगामात जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती बॅंक, महाराष्ट्र ग्रामीण बॅंक आणि व्यापारी बॅंकांच्या माध्यमातून खरीप हंगामासाठी 85 हजार 364 शेतकऱ्यांना 588 कोटी 49 लाख 92 हजार रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले. ही प्रक्रिया मे ते 30 सप्टेंबरदरम्यान चालली. ऑक्‍टोबरपासून ते 9 नोव्हेंबरपर्यंत केवळ 14 शेतकऱ्यांना 1 लाख 27 हजार रुपयांचे कर्जवाटप झाले.

- सुप्रिया सुळेंची वडिलांवर भावूक पोस्ट; म्हणतात, श्रमलेल्या बापासाठी...

बॅंक शेतकरी वाटप रक्कम टक्के 
जिल्हा बॅंक   106 32.79 0.18
महाराष्ट्र ग्रामीण 577 465.94   9.28
खासगी बॅंका 727  1248.96 20.48
सरकारी बॅंका 3106  1021.68 4.34

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crop Loan distribution slo in Aurangabad District