औंढा शहरात नागरिकांची गर्दी कायम

aundha nagnath photo
aundha nagnath photo

औंढा नागनाथ (जि. हिंगोली) : कोरोना विषाणूवर आळा घालण्यासाठी १४ एप्रिलपर्यंत लाॅकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, येथील डॉ. हेडगेवार चौक ते नगरपंचायत रोडवरील भाजीपाला मार्केटमध्ये खरेदीसाठी नागरिकांची झुबंड उडत आहे. या वेळी भाजीपाला विक्रेते व नागरिकांनीही मास्क लावलेले नव्हते. तसेच सॅनिटायझरचा वापरही करण्यात येत नसल्याचे दिसून आले. 

पोलिस कर्मचारी कर्तव्य चांगल्याप्रकारे पार पडताना दिसून येत आहे. मात्र, नागरिक नियम पाळत नसल्याचे दिसून येत आहे. याकडे लक्ष देत गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना राबविणे गरजेचे झाले आहे. दरम्यान, अत्यावश्यक खरेदीसाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांनी स्वयंत्स्फूर्तीने अंतर ठेवावे. दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, मास्‍क व सॅनिटायझरचा वापर करावा, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी दिला आहे.

नागनाथ उद्यान बंद

कोरोना साथरोगाचा प्रसार होऊ नये, यासाठी प्रशासनाने शहरातील मंदिरे, उद्याने बंद केलेली आहे. त्यामुळे उद्यानामध्ये शुकशुकाट पाहावयास मिळत आहे. एसटी महामंडळाने बसेस तसेच खासगी वाहनधारकांची वाहने बंद असल्याने शहरात येणाऱ्याची संख्या घटली आहे. त्यामुळे बसस्थानकातही शुकशुकाट पहावयास मिळत आहे.

तपासणी करूनच स्थलांतरीतांना प्रवेश

ग्रामीण भागातून अनेक गावकरी कामानिमित्त कुटुंबीयांसह पुणे, मुंबई येथे स्‍थलांतरीत झालेले आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी तेथील कामे बंद झाल्याने हे गावकरी आता गावाकडे परतत आहेत. गावात आल्यावर मात्र त्‍यांना आरोग्य तपासणी करूनचा प्रवेश दिला जात आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व व्यवसाय, रोजगार ठप्प झाला आहे. रोजगार नसल्यामुळे घर किराया, लाईट बिल इतर विविध कामासाठी पैसे खर्च करणे कामगारांना परवडणार नाही. शिवाय कोरोना होण्याची धास्ती आहेच. त्यामुळे अनेकांनी ड्या आपला गावच बरा म्‍हणत गाव गाठले आहे.

गलांडीत सोशल डिस्‍टन्स ठेवत धान्य वाटप

औंढा नागनाथ : नगरपंचायतंर्गत येणाऱ्या गलांडी येथे कोरोना साथरोगामुळे सोशल डिस्टंन्सिंग ठेवत धान्याचे वाटप नगरसेवक शंकर शेळके यांच्या पुढाकारातून केले जात आहे. कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्याच्या पार्श्वभूमीवर कलम १४४ व संचार बंदी कायदा लागू करण्यात आला आहे. त्यामुळे मजुरी करणाऱ्यांना गैरसोयींनासामोर जावे लागत आहे. गलांडी मधील मोलमजुरी करणाऱ्या नागरिकांना नगरसेवक शंकर शेळके यांच्याकडून गहू तसेच साबणाचे वाटप करण्यात आले.: 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com