विळखा कोरोनाचा... लातूर जिल्ह्यात एकाच दिवशी ४८ पॉझिटिव्ह!

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

लातूर- लातूर जिल्ह्यात कोरोना विळखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यात रविवारी (ता. १२) एकाच दिवशी ४८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर शनिवारी (ता. ११) प्रलंबित असलेल्या अहवालांपैकी १८ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ७३१ वर पोचला आहे. 

वाढता वाढे रुग्णसंख्या
येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत शनिवारी ३२८ जणांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी आले होते. त्या पैकी ४० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शनिवारी प्रलंबित असलेल्या नमुन्याचे अहवालही रविवारी आले असून त्यात ६३ पैकी १८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. रविवारच्या ३२८ पैकी २४९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर ९ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. २ नमुने रिजेक्ट करण्यात आले आहेत. ३० जणांचे अहवाल अनिर्णित आहेत. आज पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये या संस्थेतील १९, चाकूर एक, रेणापूर एक, देवणी चार, उदगीर सात, निलंगा चार, एमआयडीसी दोन, महापालिकेच्या दोन जणांचा समावेश आहे. तर शनिवारच्या प्रलंबित अहवालापैकी १८ पॉझिटिव्हमध्ये उदगीर तीन, अहमदपूर दोन, निलंगा दोन, स्त्री रुग्णालय चार, कासारशिरसी दोन व औसा येथील पाच व्यक्तींचा समावेश आहे. या ४८ पॉझिटिव्हमुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा ७३१ वर गेला आहे. यात ३३६ जणांवर उपचार सुरु असून ३६१ जण बरे झाले आहेत. 

मृतांची संख्या ३४ वर 
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत उपचार सुरू असलेल्या औराद शहाजानी येथील ६५ वर्षीय व्यक्तीचा शनिवारी (ता. ११) रात्री मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३४ वर गेली आहे. पहिल्या तीन लॉकडाउनमध्ये सुरक्षित असलेला लातूर जिल्हा आता मराठवाड्यात कोरोनाबाधितांच्या संख्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यात कोरोनामुळे बाधित होऊन मृत्यू होण्याचे प्रमाणाही वाढू लागले आहे. दोन दिवसांपूर्वी तर एकाच दिवशी चौघांचा मृत्यू झाला. हे सर्व विविध आजार असलेले ज्येष्ठ नागरिक आहेत. 

माजी उपमहापौरांना बाधा 
महापालिकेच्या एका माजी उपमहापौराला कोरोनाची बाधा झाली आहे; तसेच येथील शासकीय रुग्णालयातील दोन डॉक्टर कोरोनाग्रस्त झाले असून, या सर्वांवर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत उपचार सुरू आहेत. आपली प्रकृती चांगली असून, नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com