esakal | हिंगोलीत आकाशवाणी कार्यक्रमाने दसरा महोत्सवास सुरुवात | Dasara Festival In Hingoli
sakal

बोलून बातमी शोधा

हिंगोली :  शहरातील सर्वदुर प्रसिद्ध असलेला दसरा महोत्सव कोरोनाच्या सावटामुळे यावर्षी देखील साधेपणाने साजरा होत आहे. खाकीबाबा मठात गुरुवारी (ता.सात) आकाशवाणी या धार्मिक कार्यक्रमाने  महोत्सवास कोरोनाचे नियम पाळत सुरुवात झाली आहे.

हिंगोलीत आकाशवाणी कार्यक्रमाने दसरा महोत्सवास सुरुवात

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : शहरातील सर्वदुर प्रसिद्ध असलेला दसरा महोत्सव (Dasara Festival In Hingoli) कोरोनाच्या सावटामुळे यावर्षी देखील साधेपणाने साजरा होत आहे. खाकीबाबा मठात गुरुवारी (ता.सात) आकाशवाणी या धार्मिक कार्यक्रमाने महोत्सवास कोरोनाचे नियम पाळत सुरुवात झाली आहे. हिंगोली (Hingoli) येथील दसरा म्हैसूरच्या दसऱ्यानंतर प्रसिद्ध मानला जातो. या दसरा महोत्सवाचे १६७ वे वर्ष आहे. शहरातील मध्यवर्ती असलेल्या ठिकाणी जे ठिकाणी रामलीला मैदान या नावाने ओळखले जाते येथे साजरा केला जात होता. येथे रामलीला तसेच औद्योगिक प्रदर्शनी उभारण्यात येत होती. मात्र या ठिकाणी आता उद्यान उभारण्यात आले आहे. तसेच मागच्या वर्षीपासून कोरोनामुळे रामलीला मैदानावर भरणारा दसरा शहरातील कयाधु नदीच्या काठावर असलेल्या खाकी बाबा मठात सुरू करण्यात आला आहे.

हेही वाचा: मुंडेंनी घेतले वैजनाथांचे दर्शन,कोरोना नियम पाळण्याचे केले आवाहन

या वर्षी देखील कोरोनाच्या सावटाखाली खाकीबाबा मठात कोरोना नियमाचे पालन करीत दसरा महोत्सव सुरू झाला आहे. बुधवारी रात्री साडेआठ वाजता सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या वतीने आकाशवाणीचा धार्मिक कार्यक्रम व विधीवत पुजा आर्चा करून करण्यात आला. यावेळी महंत कौशल्य दास महाराज, विश्वासराव नायक, गणेश शाहु, श्री. गोळेगावकर, गोविंद सारस्वत, दौलत बनसोडे, गोविंद गिरी, आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा: नांदेड-अर्धापूर रस्त्यावर अपघातात दुचाकीस्वार ठार,वाहतूक ठप्प

loading image
go to top