esakal | जालन्यात चार कोरोनाबळी 
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित चित्र.

जालना शहरातील चार कोरोनाबाधितांचा रविवारी (ता. पाच) मृत्यू झाला, तर दिवसभरात ४७ रुग्णांची भर पडली. दरम्यान, कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी पंधरा रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

जालन्यात चार कोरोनाबळी 

sakal_logo
By
महेश गायकवाड

जालना - शहरातील चार कोरोनाबाधितांचा रविवारी (ता. पाच) मृत्यू झाला, तर दिवसभरात ४७ रुग्णांची भर पडली. दरम्यान, कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी पंधरा रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या २९० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

जालना शहरात कोरोनाचा संसर्ग अधिकच वाढत आहे. रविवारी तब्बल ४७ संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात सर्वाधिक रुग्ण जालना शहरात आढळून आले आहेत तर चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या चार रुग्णांमध्ये शहरातील ढवळेश्वर परिसरातील ४२ वर्षीय पुरुष, गुरुगोविंदसिंगनगरमधील पन्नासवर्षीय पुरुष, नाथबाबा गल्लीतील साठवर्षीय पुरुष व गांधीनगर भागातील ६५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. या चारही रुग्णांना न्यूमोनियाचा त्रास होता. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली आहे. दिवसभरात चार रुग्णांचा मृत्यू झाल्याने बळींचा आकडा २६ झाला आहे. 

हेही वाचा : कोरोनाबाधिताच्या अंत्यविधीला तब्बल शंभर जण

रविवारी दिवसभरात जिल्ह्यातील तब्बल ४७ संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये जालना शहरातील बुऱ्हाणनगरमधील सात, दानाबाजार भागातील पाच, कादराबादमधील दोन, जेईएस कॉलेजमध्ये अलगीकरणात असलेले दोन, जेपीसी बॅंक कॉलनीतील सहा, गांधीनगरमधील दोन, क्रांतीनगर, भाग्यनगर, सुवर्णकारनगर, नळगल्ली, संभाजीनगर, मिशन हॉस्पिटल, शिवनगर, रामनगर व व्यंकटेश दालमिल भागातील प्रत्येकी एक, अंबड तालुक्यातील भालगाव आणि दहीपुरी, चुरमापुरी येथील प्रत्येकी एक, परतूर तालुक्यातील शेवगव्हाण येथील एक, भोकरदन शहरातील तुळजाभवानीनगरमधील एक, बदनापूर शहरातील कैलासनगरमधील एक, घनसावंगीतील तीन, मसनापूर (ता. जालना) येथील दोन व औरंगाबाद येथील रामगोपालनगरमधील दोन रुग्णांचा समावेश आहे. 

हेही वाचा : आठवणींना जोडणारा लोखंडी पूल

कोविड हॉस्पिटलमधील बरे झालेल्या रुग्णांमध्ये जालना शहरातील वाल्मीकनगर, गुडलागल्ली, यशवंतनगर, मंगळबाजार, कोष्टीगल्ली, पानशेंद्रा, हकीम मोहल्ला, क्रांतीनगर, रहेमानगंज, योगेशनगर, सूर्यनारायण चाळ, बागवान मस्जीद येथील प्रत्येकी एक व नळगल्लीतील दोघांचा समावेश आहे. तर भोकरदन शहरातील रोकडा हनुमान परिसरातील एका व्यक्तीचा समावेश आहे. या सर्वांच्या सलग दुसऱ्या स्वॅब नमुन्याचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले होते.