जालन्यात कोरोनाने घेतला चौघांचा बळी 

उमेश वाघमारे 
Monday, 24 August 2020

जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे.  रविवारी (ता. २३) जिल्ह्यातील चार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला, परिणामी  आतापर्यंत १२० जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

जालना - जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे. परिणामी  आतापर्यंत १२० जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. यात रविवारी (ता. २३) जिल्ह्यातील चार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर ११३ कोरोनाबाधितांची भर पडली आहे. परिणामी आतापर्यंत चार हजार १३२ जण कोरोनाबाधित झाले आहेत. ७८ जण रविवारी कोरोनामुक्त झाल्याने आतापर्यंत तब्बल दोन हजार ८२३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या एक हजार १८९ कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी दिली. 

जालना जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांसह कोरोनामुळे होणारे मृत्यू थांबण्यास तयार नाहीत. रविवारी चार कोरोनाग्रस्तांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यात जालना शहरातील कन्हैयानगर परिसरातील ६० वर्षीय महिला, भोकरदन शहरातील ५६ वर्षीय पुरुष, अंबड शहरातील नूतन वसाहत येथील ८० वर्षीय पुरुष, किनगाव येथील ६० वर्षीय पुरुष या रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे आतापर्यंत १२० जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे,

हेही वाचा : प्रत्येक जिल्ह्यात कोरोना चाचणीची प्रयोगशाळा

कोरोनाबाधितांची प्रत्येक दिवसाला होणारी भर ही चिंताजनक आहे. रविवारी ११३ कोरोनाबाधितांची भर पडली. यामध्ये मंठा तालुक्यातील देवठाणा येथे नऊजण, जालना तालुक्यातील सेवली येथे पाचजण, जालना शहरातील प्रशांतीनगर, श्रीकृष्ण रुक्मिणीनगर व बदनापूर शहरातील प्रत्येकी चारजण, परतूर शहरातील लड्डा कॉलनी व चिंचोली (ता. परतूर) येथील प्रत्येकी तीनजण, जालना शहरातील अग्रसेननगर, मंठा शहर, परतूर शहरातील सरस्वती कॉलनी, चिखली, अंबड शहरातील चांगलेनगर, वाघाळा (ता. मंठा) येथील प्रत्येकी दोनजण, जालना शहरातील समर्थनगर, गुरुगोविंदनगर, योगेशनगर, चंदनझिरा, नूतन वसाहत, दुखीनगर, म्हाडा कॉलनी, देऊळगाव राजा, खडका, धोपटेश्वर, बदनापूर तालुक्यातील खामगाव, ढोकसाळ, निकळक, वरखेड विरो (ता. जाफराबाद), परतूर शहरातील जयभवानी गल्ली, आष्टी येथील शनिमंदिर परिसर, बोरी (ता. अंबड), अंबड शहरातील नूतन वसाहत, महसूल कॉलनी, देवी दहेगाव (ता. घनसावंगी), अवलगाव (ता. देऊळगाव राजा), वरूड, पाचोड, मांडवा, केदारखेडा, सेलूद, जवखेडा येथील प्रत्येकी एकजण असे एकूण ७१ जण तर अँटीजेन तपासणीद्वारे ४२ जण असे एकूण ११३ व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. परिणामी जिल्ह्यात आतापर्यंत चार हजार १३२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. 

हेही वाचा : जालन्यात मोबाइल व्हॅनव्दारे स्वॅब टेस्टिंग

दरम्यान, रविवारी ७८ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये भोकरदन शहरातील देशमुख गल्ली येथील १२ जण, जालना शहरातील नूतन वसाहत येथील पाचजण, ढोरपुरा, परतूर शहरातील रामेश्वर गल्ली व पिंपळगाव रेणुकाई येथील प्रत्येकी चारजण, जालना शहरातील साईनगर, गांधीनगर, पारध, घनसावंगी, कंडारी, भाजीमंडई येथील प्रत्येकी तीनजण, जालना शहरातील भवानीनगर, सोरटीनगर, नळगल्ली, हसनाबाद, विडोळी, जयभद्रानगर येथील प्रत्येकी दोनजण, जालना शहरातील देहेकरवाडी, लक्ष्मीकांतनगर, अंबड नाका, बालाजी मंदिर परिसर, तट्टुपुरा, रोहिलागल्ली, गवळीपुरा, बजाजनगर, शंकरनगर, खडका (ता. घनसावंगी), वाकुळणी, डोमलगाव (ता. अंबड), दरेगाव, सोलगव्हाण, लिंगा (ता. सिंदखेडराजा), सावखेड, फत्तेपूर रोड, कचेरी वाडी, घेटुळी, कवठा असे एकूण ७८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत दोन हजार ८२३ कोरोनामुक्त झाले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death of four corona patients in Jalna