जालन्यात कोरोनामुळे सहा जणांचा मृत्यू 

उमेश वाघमारे 
Tuesday, 25 August 2020

मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या मृत्यूमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आतापर्यंत तब्बल १२६ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. यात सोमवारी (ता. २४) तब्बल सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

जालना - मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या मृत्यूमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आतापर्यंत तब्बल १२६ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. यात सोमवारी (ता. २४) तब्बल सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर दहा कोरोनाबाधितांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत परिणामी आतापर्यंत चार हजार १४२ जण कोरोनाबाधित झाले आहेत. तर ७४ जण सोमवारी कोरोनामुक्त झाल्याने आतापर्यंत तब्बल दोन हजार ८९७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या एक हजार ११९ कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. 

जालना कोविड रुग्णालय येथे रोज कोरोनाबाधितांची भर पडत आहे; मात्र मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित मृत्यूची संख्याही वाढू लागली आहे.

हेही वाचा : प्रत्येक जिल्ह्यात कोरोना चाचणीची प्रयोगशाळा

सोमवारी (ता. २४) सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यात शहरातील नूतन वसाहत येथील ५५ वर्षीय महिला, देवगाव तांडा येथील ४० वर्षीय पुरुष, पांगरी गोसावी येथील ५५ वर्षीय पुरुष, देऊळगावराजा येथील बालाजीनगरमधील ७० वर्षीय पुरुष, देऊळगावराजा येथील ६२ वर्षीय पुरुष, नागेवाडी येथील ६२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर दहा कोरोनाबाधितांची भर पडली आहे. 

हेही वाचा : जालन्यात मोबाइल व्हॅनव्दारे स्वॅब टेस्टिंग

दरम्यान, सोमवारी (ता. २४) ७४ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये राज्य राखीव पोलिस गटाचे ३६ जवान, जालना शहरातील खासगी रुग्णालयातील चारजण, महिको कॉलनी व परतूर शहरातील जुना मोंढा येथील प्रत्येकी तीनजण, जालना शहरातील लक्ष्मीनायणपुरा व गोकुळधाम येथील प्रत्येकी दोनजण, जालना शहरातील जानकीनगर, पेन्शनपुरा, मुरारीनगर, रामनगर पोलिस कॉलनी, कादराबाद, रामनगर, सदर बाजार, यशवंतनगर, मिशन हॉस्पिटल परिसर, श्रीनगर, अग्रसेननगर, क्रांतीनगर, घनसावंगी, भोकरदन, माळीपुरा बुलडाणा, सावता माळीनगर (जि. बुलडाणा), दैठणा (ता. घनसावंगी), परतूर, आष्टी (ता. परतूर), लालवाडी, पैठण, जामवाडी, बावणे पांगरी, अंबड तालुक्यातील अंकुशनगर येथील प्रत्येकी एकजण अशा एकूण ७४ जणांना उपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death of six corona patients in Jalna