esakal | लातूर जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहिमेत देवर्जन आरोग्य केंद्र अव्वल, पहिल्याच दिवशी शंभर जणांनी घेतली लस

बोलून बातमी शोधा

Udgir Corona Vaccination News}

प्रथम २० लसीकरण डोस सुद्धा महिलांना प्राधान्याने देण्यात आले. पंचायत समिती सभापती शिवाजी मुळे  व जिल्हा परिषद सदस्य आशा पाटील यांच्या घरातील सदस्यांनी लसीकरण घेऊन ग्रामस्थांना प्रोत्साहन दिले.

लातूर जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहिमेत देवर्जन आरोग्य केंद्र अव्वल, पहिल्याच दिवशी शंभर जणांनी घेतली लस
sakal_logo
By
युवराज धोतरे

उदगीर (जि.लातूर) : कोरोना संसर्गजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासनाने सुरू केलेल्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू झाला असून प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर सोमवारपासून (ता.आठ) येथील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यात पहिल्याच दिवशी देवर्जन (ता.उदगीर) प्राथमिक आरोग्य केंद्रात शंभर जणांना लस देऊन या प्राथमिक आरोग्य केंद्राने जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. जागतिक महिला दिनानिमित्त प्रथम डोस देवर्जनच्या प्रथम नागरिक सरपंच सुनीता खटके यांना देऊन कोव्हिशिल्ड लसीकरण मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला.

हेही वाचा - म्हैसमाळला अवैध धंद्यांचा विळखा, पोलिस महानिरीक्षकांना पाठविला अहवाल

प्रथम २० लसीकरण डोस सुद्धा महिलांना प्राधान्याने देण्यात आले. पंचायत समिती सभापती शिवाजी मुळे  व जिल्हा परिषद सदस्य आशा पाटील यांच्या घरातील सदस्यांनी लसीकरण घेऊन ग्रामस्थांना प्रोत्साहन दिले. जिल्ह्यात १०० जणांचे लसीकरण करून देवर्जन केंद्राने प्रथम क्रमांक पटकविला आहे. यात ज्येष्ठ नागरिक, दुर्धर आजार असलेले नागरिक, शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासह आरोग्य कर्मचारी यांचा समावेश होता.

हेही वाचा - हे वागणं बरं नव्ह! दोघे पोलिस कर्मचाऱ्यांचे केवळ पाचशे रुपयांवरुन रस्त्यावर कपडे काढून तुंबळ हाणामारी

देवर्जन येथील ग्रामस्थ व दावनगाव येथील ग्रामस्थ यांनी आजच्या लसीकरण मोहिमेस उत्सूर्फपणे प्रतिसाद दिला. जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. बालजी बरुरे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत कापसे यांनी या केंद्रास भेट देऊन लसीकरण मोहीम यशस्वीपणे पार पडली. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण गोरे, डॉ. गांगाबोने, जयश्री पेडेवाड, सुनील येसालवाड, जयपाल वाडीकर, एन.जे.शिंदे, एम.एन वजिरे, नीता दाडगे, राजू वाडीकर, चंद्रकांत हवा, वसंत हसनाबादे व आशा ताई यांनी पुढाकार घेतला.

हेर केंद्रावर सर्वात कमी लसीकरण
हेर (ता.उदगीर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वाधिक कमी म्हणजे केवळ १६ जणांना कोव्हिशिल्ड लस देण्यात आली. हंडरगुळी प्राथमिक आरोग्य केंद्रात ३० नळगीर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ५६, तर वाढवणा बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ३६ जणांना कोव्हिशिल्ड लस देण्यात आली असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत कापसे यांनी दिली आहे.

संपादन - गणेश पिटेकर