esakal | 'मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेच', धनंजय मुंडेंचा पंकजा यांना भावनिक आधार

बोलून बातमी शोधा

dhanajay munde and pankaja munde
'मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेच', धनंजय मुंडेंचा पंकजा यांना भावनिक आधार
sakal_logo
By
प्रमोद सरवळे

बीड: भाजप नेत्या पंकजा मुंडेंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. याची माहिती त्यांनी सोशल मीडियावर दिली होती. त्यानंतर पंकजा मुंडेंना अनेक कार्यकर्त्यांचे आणि चाहत्यांचे काळजी घ्यावी अशा कमेंट आल्या. पण सर्वात महत्त्वाची आणि भावनिक प्रतिक्रिया बंधू धनंजय मुंडे यांची आहे.

धनंजय मुंडेंनी ट्वीट करत काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये त्यांनी पुढील प्रतिक्रिया दिली आहे, 'ताई, या विषाणूचा सामना मी दोनवेळा केलाय, यामुळे होणाऱ्या त्रासाची मला जाणीव आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने तातडीने योग्य उपचार घ्या. घरच्या सर्वांची टेस्ट करून घ्या, मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेच. प्रभू वैद्यनाथाच्या आशीर्वादाने आपण लवकरच बऱ्या व्हाल, काळजी घ्या ताई.'

राजकारणात दोघे विरोधक जरी असले तरी पंकजा आणि धनंजय मुंडे अडचणींच्यावेळी एकत्र आल्याचे पाहायला मिळाले आहे. यापुर्वी धनंजय मुंडेंना दोनदा कोरोना झाला होता. त्यावर त्यांनी मात करून पुन्हा कामास सुरुवात केली आहे.