लातूरच्या 'धनेगाव' बॕरेजचा मार्ग मोकळा; पंधरा वर्षानंतर तीन तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार फायदा

latur water news.jpg
latur water news.jpg

निलंगा (लातूर) : मांजरा नदीवरील धनेगाव (ता.देवणी) येथील उच्च पातळी बॕरेज यंदा पूर्ण क्षमतेने भरणार असून नदीकाठच्या जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना मावेजा मिळाल्याने पूर्ण क्षमतेने बंधारा थांबण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. डोंगरगाव बॕरेजमधून मंगळवारी (ता.१५)मांजरा नदीपात्रात पाणी सोडल्याने तिन्ही तालुक्यातील नदीकाठच्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
तालुक्यातून वाहणाऱ्या मांजरा नदीवर धनेगाव (ता. देवणी) येथे सतरा वर्षांपूर्वी बॕरेज बांधण्यात आले होते. मात्र त्या बंधाऱ्याच्या बुडीत क्षेत्रामध्ये गेलेल्या जमिनीचा मोबदला मिळाला नसल्यामुळे सतत शेतकरी संघर्ष करीत होते. तालुक्यातील वळसांगवी, गिरकचाळ, शिऊर, व धनेगाव, हेळंब (ता.देवणी) या गावातील ३२९ शेतकऱ्यांची जवळपास २१२ हेक्टर जमीन संपादीत झाली. यासाठी शासनाकडून ६२ कोटी १२ लाख ७२ हजार १३१ रूपये मावेजा पैकी ८ कोटी ९१ लाख ४० हजार ४२० इतक्या मावेजाचे यापूर्वी वाटप करण्यात आले होते.

तर जवळपास ५३ कोटी रूपये शासनाकडे प्रलंबीत होते. मावेजा न मिळाल्यामुळे त्या बॕरेजमध्ये पूर्ण क्षमतेने पाणी अडवण्यास शेतकऱ्यांचा विरोध होता. त्यामुळे बँरेजचा मुळ उद्देश साध्य करता येत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी सतत संघर्ष चालू ठेवला. त्या संघर्षाची दखल घेऊन तत्कालीन पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यानी याबाबत प्रयत्न करून निधी मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करून शेतकऱ्यांना द्यावा लागणारा मावेजा मंजूर करून घेतला. व जवळपास ५३ कोटी रूपये मावेजाचे वाटप करण्यात आले होते.

लातूरसह संपुर्ण मराठवाड्यात पाऊस न झाल्याने दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र परतीचा पाऊस शेतकऱ्यांना दिलासा देत आहे. सध्या चार दिवसांपासून पाऊस पडत असल्यामुळे मांजरा नदीवरील बॕरजेस पूर्ण क्षमतेने भरले असून पिण्याचा पाण्याचा, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटला आहे. तर यावर्षी धनेगाव बॕरेजमध्ये पूर्ण क्षमतेने पाणी अडवले जाणार असून याचा फायदा निलंगा, देवणी व शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. 

सध्या पडत असलेल्या पावसामुळे नदीपात्राच्या परिसरात पाणी वाढणार असून मांजरा नदीवरील सर्व बॅरेजेस भरण्यात येणार आहेत. घरणी नदीला पाणी आल्यामुळे यापूर्वी बंधाऱ्यामध्ये कांही प्रमाणात पाणी पातळीत वाढ झाली आहे. शिवाय गिरकचाळ (ता.निलंगा) येथील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याला यावर्षी दारे टाकण्यात येणार नसल्यामुळे धनेगाव बॅरेज पूर्ण क्षमतेने पाणी थांबणार असून नदीकाठच्या शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. तब्बल पंधरा वर्षानंतर शिरूरअनंतपाळ, देवणी व निलंगा तालुक्यातील अनेक गावच्या शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. 

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा 
डोंगरगाव बॕरेज मधून मांजरा नदी पात्रात पाणी सोडण्यात येत असल्यामुळे नदीकाठच्या गावाला सावधानतेचा इशारा दिला असून लघु पाटबंधारे विभागाने शेंद, बसपूर, नदीवाडी, हंचनाळ, उजेड, बाकली, बिब्राळ, राणीअंकुलगा, माटेगडी, निटूर, शिरोळ-वांजरवाडा, गिरकचाळ यासह आदी गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com