

Youth Loyalty Slabs: Congress Fields ZP Member Mahesh Deshmukh for Tough Electoral Terrain
Sakal
उमरगा : उस्मानाबाद (धाराशिव)–लातूर–बीड स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीसाठी 'महायुती' तुन भाजपने माजी राज्यमंत्री तथा लातूर ग्रामीण भाजप जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील (मुरूमकर) यांना उमेदवारी जाहिर केली आहे. तर 'महाविकास आघाडी' तुन काँग्रेसने धाराशिव जिल्हा परिषदेचे सदस्य महेश देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान एक जेष्ठ नेता आणि एक तरुण निष्ठावंत पदाधिकारी असलेले दोन्ही उमेदवार उमरग्याचे भूमिपुत्र असून दोघेही समर्थक पदाधिकारी व कार्यकर्त्यासह सोमवारी (ता. एक) धाराशिवचे जिल्हाधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी किर्तीकुमार पुजार यांच्याकडे नामनिर्देशनपत्र दाखल करणार असल्याचे अधिकृत सूत्राने सांगितले.