

New crisis for drought-hit sugarcane farmers; Rs 5,000 to 7,000 per acre demanded!
Sakal
धाराशिव : आधीच दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर आता ऊसतोडणीच्या खर्चाचे नवे संकट ओढवले आहे. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील बलसूर येथे लोकमंगल माऊली साखर कारखान्यासाठी ऊसतोडणी करणाऱ्या हार्वेस्टर चालकांकडून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे.