
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र धीरज देशमुख, रितेश देशमुख यांनी बुधवारी (ता. दोन) तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले.
तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र धीरज देशमुख, रितेश देशमुख यांनी बुधवारी (ता. दोन) तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले.
वैशालीताई विलासराव देशमुख, जेनेलीया देशमुख यांच्यासह कुटुंबातील अन्य काही सदस्यही त्यांच्यासोबत होते. विधानसभा निवडणुकीसाठी लातूर शहर मतदारसंघातून कॉंग्रेसतर्फे अमित देशमुख पुन्हा रिंगणात उतरले आहेत. तर त्यांचे बंधू धीरज देशमुख यांना लातूर ग्रामीण मतदारसंघातून उमेदवारीची संधी पक्षाने दिली आहे. दोघे बंधू गुरुवारी (ता. तीन) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तत्पूर्वी धीरज व अभिनेते रितेश यांनी कुटुंबीयांसह आज तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले.
Vidhan Sabha 2019 : सिंधुदुर्गात विद्यमान आमदारांसमोर बंडखोरांचे आव्हान
लोकनेते विलासराव देशमुख हे नवरात्रोत्सवात तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येत असत, अशी आठवण भोपे पुजारी बुबासाहेब पाटील यांनी सांगितली.
Vidhan Sabha 2019 : चंद्रकांत पाटील यांनी घेतली प्रवीण तरडे यांची भेट