esakal | तुळजापूरात मंदिर प्रशासनाची पुजाऱ्यांवर हुकूमशाही; आमदार राणांच्या बैठकीनंतर घडला प्रकार
sakal

बोलून बातमी शोधा

तुळजाभवानी मातेचे मंदिर.jpg

तुळजापूर येथील कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे मंदिर खुले होऊन पंधरा दिवसही उलटले नाही. तोच मंदिर प्रशासन आणि पुजारी वर्गात वाद सुरु झाला आहे. कोविड नियमांचे बंधन टाकून एकाप्रकारे पुजारी बांधवांचे खच्चीकरण केले जात आहे. तर त्यांच्यावर हुकुमशाही गाजविली जात आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपुर्वी लोकप्रतिनिधी आमदार राणा जगजितसिंहाच्या बैठकीनंतर मंदिर प्रशासक तथा तहसीलदार तांदळे यांनी चक्क मंदिराचे धार्मिक व्यवस्थापक यांना पत्र पाठवून पुजाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे सूचविले आहे. त्यामुळे या पत्राने सर्वत्र नाराजी व्यक्त केली जात आहे. परंतू ही नाराजी उघडपणे न बोलता तोंड मारून मारा देण्यासारखी सहन केली जात आहे, हे मात्र नक्कीच. 

तुळजापूरात मंदिर प्रशासनाची पुजाऱ्यांवर हुकूमशाही; आमदार राणांच्या बैठकीनंतर घडला प्रकार

sakal_logo
By
जगदीश कुलकर्णी

तुळजापूर (उस्मानाबाद) : तुळजाभवानी मंदिरात शिस्तीचे पालन न करणाऱ्या पुजाऱ्यांवर त्वरीत कारवाईचा प्रस्ताव द्यावा, अशी सूचना तुळजा भवानी देवस्थान समितीचे व्यवस्थापक (प्रशासक) तथा तहसीलदार सौदागर तांदळे यांनी मंदिराचे धार्मिक व्यवस्थापक एस. एस. इंतुले यांना (ता.21) दिला आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

तहसीलदार सौदागर तांदळे यांनी श्री इंतुले यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, तुळजा भवानी मातेच्या गाभाऱ्यात बेशिस्त वर्तन करणाऱ्या पुजाऱ्यावर कारवाई करण्यासाठी पत्र देण्यात आले असून आमदार राणाजगजितसिंह पाटील तथा तुळजा भवानी मंदीर समितीचे विश्वस्त यांच्या अध्यक्षतेखाली  शनिवारी (ता.21) नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीचा संदर्भ देण्यात आलेला आहे. या पत्रामध्ये श्री. तांदळे यांनी श्री इंतुले यांना सूचित केले की, कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने दिलेल्या आदेशाप्रमाणे तुळजाभवानी मंदिरात भाविकांना 26 मार्च 2020 पासून प्रवेशास मनाई करण्यात आली होती. तथापी राज्य सरकारने 14 नोव्हेंबरला धार्मिळ स्थळे खूली केली आहेत. त्यासाठी काही नियमावली लावून दिली आहे. ज्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश येईल.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

तुळजाभवानी मातेच्या मुख्य गाभाऱ्यात कोणालाही प्रवेश दिला जाणार नसून सिंहाच्या गाभाऱ्यात चोपदार दरवाज्यासमोर तसेच भवानीशंकराच्या गाभाऱ्यातून भक्तांना केवळ प्रवेश दिला जाणार आहे. भक्तांसमवेत गाभाऱ्यात प्रवेश करणारे पुजारी यांना गाभाऱ्यात कोणत्याही प्रकारचे कुलाचार, कुळधर्म अथवा ओटी भरणे इत्यादी धार्मिक विधी करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे पुजाऱ्यांकडून बेशिस्त वर्तन करण्यात आले. किंवा नियमांचे उल्लंघन करण्यात आले. तर अशा पुजाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात तुम्ही प्रस्तावित करणे गरजेचे आहे. तहसीलदारांकडून आलेल्या या पत्रामुळे तुळजापूरात भाविकांसह पुजारी वर्गात खळबळ निर्माण झाली आहे. एक प्रकारे आमदारांच्या बैठकीनंतरच प्रशासनाकडून पुजारी बांधवांची गळचेपी केली जात आहे, असा आरोपही होऊ लागला आहे.  

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

पाटील यांच्या बैठकीचा काही संबंध नाही 
तुळजापुरचे नगराध्यक्ष श्री. रोचकरी याबाबत म्हणाले की, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन सदर बैठकीमध्ये गाभार्यात बेशिस्त वर्तन करणाऱ्या पुजाऱ्यांवरती कारवाई करण्याचे पत्रक काढण्यात आले आहे. तथापि या पत्राचा कुठलाही संबंध आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा नाही. तुळजापूर शहरातील पुजारी बांधवांनी गैरसमज करून घेऊ नये असे त्यांनी सांगितले. पुजारी बांधवांना भाविकांसोबत गाभाऱ्यापर्यंत प्रवेश करण्यासाठी मागणी मान्य करण्यात आली आहे. तथापि गाभाऱ्यामध्ये कोरोनाच्या पाश्वभूमीवर पुजा करता येणार नाही असे पुजारी आणि मंदीर संस्थान यांच्यामध्ये ठरले आहे. त्या संबंधीत पुजारी जबाबदार राहील असेही श्री रोचकरी यांनी सांगितले.

अधिकारी सांगतील तसे वागावे लागते 
दरम्यान तुळजाभवानी मंदिरात अधिकारी दिशा देतील तसे विश्वस्त ऐकतात अशीही चर्चा शहरात चालू आहे. तुळजाभवानी मंदीरात मागील आठ ते नऊ महिन्यांपासून तुळजा भवानी मंदीर बंद असून ही पुजार्यांनी सर्व सूचनांचे पालन आतापर्यंत केलेले आहे. मंदिरात दश॔न मंडपातून पुजाऱ्यांना सिंहाच्या गाभार्यात प्रवेश दिला जात आहे. शहरातील पुजारी व्यावसायिकांना मिळणार्या वागणुकीबाबत ही मोठी खदखद निर्माण झाली आहे. तुळजाभवानी मंदीरात वर्षानुवर्षे प्रशासनातील अधिकार्यांच्या अध्यतेखालील बैठका यापूर्वी होत असल्याचे दिसून आले. आज रविवारी (ता.22) दुपारी चार वाजेपर्यंत अजून मंदीरात कोणतेही फेरबदल पुजारी मार्गाबाबत झाले नसल्याचे सांगण्यात आले. तुळजाभवानी मंदिराकडून शुद्धीपत्रक काय निघते याकडेही लक्ष लागलेले आहे.

(संपादन-प्रताप अवचार)