आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत : पुर्नवसन मंत्री वडेट्टीवार 

शिवशंकर काळे
Sunday, 18 October 2020

जळकोट तालूक्यातील शिवसेना. कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी घेतली बैठक.  

जळकोट (जि.लातूर) : तालुक्यासह लातूर जिल्हा व मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचे पंचनामे करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. सर्व भागांमध्ये राज्य शासनाच्या वतीने आम्ही पाहणी दौरे करत आहोत शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातात आलेले नगदी पिकांचे नुकसान झाले आहे. सदर अहवाल शासनाच्या कॅबिनेट बैठकीत ठेवून शेतकऱ्यांसाठी जास्तीची मदत कशी करता येईल ती करण्याचा आम्ही प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जळकोट येथे केले. शेतकऱ्यांची संवाद साधताना (ता.18) दिले. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

जळकोट तालुका कॉग्रेस, राष्टवादी, शिवसेनेच्या वतीने मंञ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रवीण मेगशेट्टी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मन्मथ किडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील आगलावे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संगमेश्वर टाले, जिल्हा परिषदेचे गटनेते संतोष तिडके, अभय साळुंके, बाबुराव जाधव, सत्यवान पाटील दळवे, मारुती पांडे, गजानन दळवे, गोविंद भ्रमण्णा, बालाजी ठाकूर, प्राध्यापक शाम डावळे, दस्तगीर शेख, नगरसेवक महेश धुळशेट्टे, संग्राम नामवाड, मुखेडचे माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, उपसभापती सुभाष पाटील, चेअरमन अशोक डांगे उपस्थित होते. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

पुढे बोलताना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची परिस्थिती खूप बिकट असून पिक विमा कंपनी, राज्य शासन यांच्यावतीने अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हे सरकार मदतीसाठी तयार आहे. नव्हे ती आमची जबाबदारी आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Disaster affected farmers will get maximum help Minister Vadettiwar