परभणी : येलदरी धरणातून पुन्हा विसर्ग वाढवला

येलदरी धरणातून संध्याकाळी पुन्हा विसर्ग वाढवण्यात आला असल्याने सद्यस्थितीत ५३ हजार ३३६. ७६ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग पूर्णेच्या पात्रात सोडला जात आहे.
परभणी : येलदरी धरणातून पुन्हा विसर्ग वाढवला
sakal

जिंतूर (जि.परभणी) : तालुक्यातील येलदरी धरणातून संध्याकाळी पुन्हा विसर्ग वाढवण्यात आला असल्याने सद्यस्थितीत ५३ हजार ३३६. ७६ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग पूर्णेच्या पात्रात सोडला जात आहे. गेले कांही दिवसापासून येलदरी धरणातून टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येणाऱ्या विसर्गात मंगळवारी (ता.२८) दुपारी बत्तीस हजार २३८.११ क्युसेक्स पर्यंत वाढवला होता. परंतु उर्ध्व भागातील खडकपूर्णा प्रकल्प व येलदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सतत मुसळधार पाऊस पडत आहे.

परभणी : येलदरी धरणातून पुन्हा विसर्ग वाढवला
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी हवी शाळा

त्यामुळे धरणांतील पाणीपातळी वेगाने वाढत आहे. दरम्यान मंगळवारी दुपारी तीन वाजेपासून खडकपूर्णा धरणातून विसर्ग वाढवून जवळपास ७२ हजार क्युसेक्स नदीपात्रात सोडण्यात आला. त्यामुळे अगोदरच शंभर टक्के भरलेल्या येलदरी धरणाच्या पाणीपातळीत अतिरिक्त पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे निर्माण होणारी पूर परिस्थिती नियंत्रणात राहण्याच्या दृष्टीने प्रशासनाच्या सुचनेनुसार व येलदरी येथील परिरक्षण उपविभागाचे उपविभागीय अधिकारी भ.के.शिंदे यांच्या आदेशानुसार संध्याकाळी सव्वासात वाजता येलदरी धरणाचे एक, पाच, सहा व दहा क्रमांकाचे दरवाजे (Spillway gate) आणखी अर्धा मीटर अर्थात दीड मीटरपर्यंत उघडण्यात आले.

परभणी : येलदरी धरणातून पुन्हा विसर्ग वाढवला
रायगव्हाण व तावरजाची ओव्हरफ्लोकडे वाटचाल

तर दोन, तीन, चार, सात, आठ आणि नऊ क्रमांकाचे दरवाजे एक मीटर ठेवून त्याद्वारे ५३ हजार ६३६.७६ क्युसेक्स आणि वीज निर्मितीद्वारे २७०० क्युसेक्स असा एकूण ५३ हजार ३३६.७६ क्युसेक्स (१५१०.३३७ क्युमेक्स) पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडला जात आहे. धरणातील विसर्ग वाढल्यामुळे धरणाच्या समोरच्या भागातील पुलावरून प्रचंड वेगाने पुराचे पाणी वाहणार असल्याने पुलावरून होणारी वाहतूक बंद करण्याच्या सूचना प्रशासनातर्फे संबंधितांना देण्यात आल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com