गोलंदाजी नव्हे, बंदुकीची गोळी! क्रिकेटमध्ये ‘उस्मानाबाद एक्स्प्रेस’ची चर्चा

युवा विश्वकरंडक स्पर्धेत चमकतोय उगवता तारा राजवर्धन हंगरगेकर
Rajvardhan Hangargekar
Rajvardhan HangargekarSakal Digital

उस्मानाबाद : सध्या सुरू असलेल्या १९ वर्षांखालील विश्वकरंडक क्रिकट स्पर्धेत भारतीय युवा संघात येथील राजवर्धन हंगरगेकरचा समावेश आहे. या स्पर्धेत त्याची कामगिरी लक्षवेधी ठरत असून भारतीय क्रिकेटमधील उगवता तारा म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे.आयर्लंडविरुद्ध बुधवारी (ता. १९) मध्यरात्री झालेला सामना जिंकून भारताने थाटात उपउपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या सामन्यातही भारतीय युवांनी धावांचा डोंगर रचला. (Rajvardhan Hangargekar journey)

Rajvardhan Hangargekar
दिल्ली येथील आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत महाराष्ट्राला प्रथम पारितोषिक!

पन्नास षटकांत सात बाद ३०५ अशी कामगिरी केल. त्यात राजवर्धनचाही लाखमोलाचा वाटा राहिला. त्याने नाबाद ३९ धावांची नाबात खेळी करताना अखेरच्या षटकातील चार चेंडूंवर तीन षटकार, एक चौकार खेचला.१७ चेंडूत ३९ धावा केल्या. आयर्लंडचा संघ १३३ धावांत गारद झाला आणि भारतीय युवांनी हा समाना १७४ धवांनी जिंकला. गोलंदाजीतही राजवर्धनने चमक दाखवली. त्याने एक गडी बाद केला. त्याच्या या कामगिरीने उस्मानाबादचे नाव जगभर चमकले.मागास जिल्हा अशी उस्मानाबादची ओळख आहे. या जिल्ह्यात खेळाच्या कसल्याही सुविधा नसताना राजवर्धनने ही वाटचाल सुरू आहे. राजवर्धनचे वडील सुहास हंगरगेकर यांचे दोन वर्षांपूर्वी आजाराने निधन झाले. वडीलांचे स्वप्न साकार करण्यासाठी त्याने कसून सराव सुरू ठेवला. त्यासाठी त्याला आई अनिता यांचे खंबीर पाठबळ मिळाले, मिळत आहे. (Rajvardhan Hangargekar fulfil late father's dream)

Rajvardhan Hangargekar
अकोला : २४ जानेवारीपासून शाळेची घंटा वाजणार

आतापर्यंतची कामगिरी

येथील रायझिंग क्रिकेट क्लबचा वेगवान गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून राजवर्धन खेळत आहे. १९ वर्षांखालील स्पर्धेमध्ये विजय हजारे क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र क्रिकेट संघाकडून दिल्लीत झालेल्या पाच सामन्यांमध्ये त्याने २० बळी घेतले. बाद फेरीमध्ये नऊ बळी व उपांत्य सामन्यात कर्नाटक विरुद्ध नाबाद ९३ धावांची आक्रमक फलंदाजी व गोलंदाजी करून महाराष्ट्र संघास अंतिम फेरीत प्रवेश मिळवून दिला. अंतिम सामन्यामध्ये महाराष्ट्र संघाचे सात बाद ६२ धावा असताना राजवर्धनने आक्रमक ७० धावाची खेळी केली. या अष्टपैलू खेळीमुळे त्याची चँलेजर करंडकासाठी निवड झाली. चँलेजर ट्रॉफीमध्ये इंडिया ‘क’ संघातून खेळताना १२ बळी घेत निवड समितीचे लक्ष वेधून घेतले. तिरंगी मालिकेतील १९ वर्षांखालील इंडिया ‘अ’ व इंडिया ‘ब’ संघ बांग्लादेश या संघाचा समावेश होता. तिरंगी मालिकेतही राजवर्धनने आपला करिष्मा दाखवून दिला. त्याने त्यामध्ये सात बळी घेतल्याने त्याची आशिया स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. यापूर्वी चौरंगी मालिकेत इंडिया ‘ब’ संघात, मुस्ताक अली टी २०, १४,१६,१९,२३ वर्षाखालील सर्व वयोगटातून महाराष्ट्र संघामध्ये तो खेळला आहे. (Rajvardhan Hangargekar maharashtra pacer osmanabad express)

गोलंदाजी नव्हे, बंदुकीची गोळी!

सध्या सुरू असलेल्या १९ वर्षांखालील विश्वकरंडक क्रिकट स्पर्धेत भारतीय संघाकडून खेळताना त्याने स्वतःला सिद्ध केले. या स्पर्धेत १४५ किमी प्रति तास वेगाने राजवर्धन चेंडू टाकत आहे. प्रसिद्ध समालोचक सायमन डूल यांनी त्याच्या वेगवान गोलंदाजीला ‘बंदुकीची गोळी’ अशी उपमा दिली. अनेकांनी त्याला ‘उस्मानाबाद एक्स्प्रेस’ असे संबोधले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com