अल्पवयीन युवतीचा विनयभंग

प्रल्हाद कांबळे
रविवार, 22 मार्च 2020

नांदेड जिल्ह्यात एका युवतीचा विनयभंग तर दुसऱ्या घटनेत एका विवाहितेचा सासरच्या मंडळीकडून छलाची घटना घडली आहे. या दोन्ही प्रकरणात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेड : एका अल्पवयीन युवतीस रस्त्यात गाठून तिचा विनयभंग, पोक्सो आणि ॲट्रॉसीटीनुसार युवकावर शुक्रवारी (ता. २०) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना इंजेगाव (ता. नांदेड) शिवारात ता. १७ मार्च रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. 

नांदेड तालुक्यातील एक १५ वर्षीय युवती आपल्या बहिणीला भेटून घराकडे पायी जात होती. यावेळी तिला शुक्रवारी सायंकाळी इंजेगाव (ता. नांदेड) येथील एका युवकाने रस्त्यात अडविले. त्याने तिचा विनयभंग केला. तिच्याशी अश्‍लिल चाळे करुन दुचाकीवर जबरीदस्तीने बसविण्याचा प्रयत्न केला. याच्या तावडीतून पिडीत युवतीने सुटका करुन घेतली. त्यानंतर घडलेला प्रकार तिने आपल्या पालकांना सांगितला. पालकांनी तिला सोबत घेऊन नांदेड ग्रामिण पोलिस ठाणे गाठले. तिच्या फिर्यादीवरुन विनयभंग करणाऱ्याविरुद्ध विनयभंग व पोस्को आणि ॲट्रासीटी कायद्यानूसार गुन्हा दाखल केला. तपास उपविभागीय पोलिस अधिकारी (इतवारा) धनंजय पाटील करत आहेत. 

हेही वाचा -  तुराट्यांचे सरण पेटवून शेतकऱ्याने घेतली उडी...

एक लाखासाठी विवाहितेचा छळ 

नांदेड : दुचाकी खरेदीसाठी माहेराहून एक लाखाची मागणी करून एका विवाहितेचा मानसिक व शारिरीक छळ करणाऱ्या सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अर्धापूर तालुक्यातील बारसगाव येथील एका तरुणीचे लग्न औरंगाबाद येथील सुनील सातपुते याच्यासोबत रितीरिवाजानुसार झाले होते. लग्नानंतर तिला सासरी काही दिवस चांगले नांदवले. त्यानंतर मात्र तिचा दुचाकीसाठी माहेराहून एक लाख रुपये आणण्यासाठी मानसिक व शारिरीक छळ सुरू केला. वेळप्रसंगी तिचा पती सुनिल सातपुते हा अधूनमधून मारहाण करत असे. एवढेच नाही तर तीला उपाशी ठेवत असत. या त्रासाला त्याचे इतर नातेवाईक मदत करत असल्याने या त्रासाला पीडीत विवाहिता त्रासुन गेली होती. सासरी होणारा त्रास तीने आपल्या माहेर सांगितला होता. 

येथे क्लिक करा - न्यायीक व कर्मचारी वर्ग आळीपाळीने काम करणार : न्या. धोळकिया

अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा

परंतु तिच्या माहेरच्या मंडळीनीही त्यांना समाजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या वागण्यात काही बदल झाला नाही. सासरच्या मंडळीनी तिला धक्काबुक्की करुन घरातून हाकलून दिले. हा प्रकार ता. दोन जूलै २०१६ ते ता. १८ फेब्रुवारी २०२० पर्यंत सासरी औरंगाबाद व माहेर बारसगाव येथे घडला. या त्रासाला कंटाळून अखेर पिडीत महिलेनी अर्धापूर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पिडीतेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी सुनिल रमेश सातपुते, रमेश गंगाधर सातपुते, निर्मलाबाई रमेश सातपुते, सचीन रमेश सातपुते, साधना दिवेकर, रमा किशन सुखदान आणि बाळू गायकवाड यांच्याविरुद्ध विवाहितेच्या छळासह आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक फौजदार डी. व्ही. केदार करत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Disgrace of a Minor Girl nanded crime news