जालना पालिकेकडून शहरात निर्जंतुकीकरण

उमेश वाघमारे
गुरुवार, 26 मार्च 2020

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात  लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. जिल्हा पातळीवरही प्रशासन या विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून उपाय योजना करीत आहेत. याचा एक भाग म्हणून जालना नगरपालिकेच्या वतीने मागील चार दिवसांपासून शहरातील विविध वाॅर्डात निर्जंतुकीकरण केले जात आहे

जालना -  कोरोना विषाणुचा संसर्ग  रोखण्यासाठी जालना नगरपालिकेच्या वतीने शहरात निर्जंतुकीकरण केले जात आहे. शहरातील प्रत्येक वाॅर्डात नगरपालिकेकडून औषधाची फवारणी करण्यात येत आहे.

जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. महाराष्ट्रात कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात  लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. जिल्हा पातळीवरही प्रशासन या विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून उपाय योजना करीत आहेत. याचा एक भाग म्हणून जालना नगरपालिकेच्या वतीने मागील चार दिवसांपासून शहरातील विविध वाॅर्डात निर्जंतुकीकरण केले जात आहे.

हेही वाचा : जालन्याच्या इतिहासात प्रथमच स्टील उद्योग बंद

 पुढील काळात  शहरात निर्जंतुकीकरण करण्यासाठी नगरपालिकेकडून सोडियम हाइड्रोक्लोराइडची फवारणी करण्यात येणार आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी नगरपालिका स्तरावर इतर विविध उपाययोजना  करण्यात आल्या आहेत. शहरातील फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेत्यांना तोंडाला मास्क किंवा रुमाल लावून विक्री करण्याच्या सूचना ही नगरपालिकेने दिल्या आहेत. 

हेही वाचा : ग्रामीण भागातील हार्वेस्टरचीही चाके थांबली

दरम्यान, आतापर्यंत जालना जिल्ह्यात एकही कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळलेला नाही.  जिल्ह्यात आतापर्यंत  एकूण ५९ रुग्णांना रुग्णालयात दाखल झाले असून ५७ रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. त्यापैकी ४२ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आला असून  असुन १२ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.  तसेच सध्या  एकुण १५ रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाले आहेत. 

 शहरात नगरपालिकेच्या वतीने औषध फवारणी केली जात आहे. पुढील काळात  सोडियम हाइड्रोक्लोराइडची फवारणी करण्यात येणार आहे.
-नितीन नार्वेकर, मुख्याधिकारी, नगरपालिका, जालना.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Disinfection in the city by the Jalna municipality