वृत्तपत्र विक्रेत्यांना सॅनिटायझरचे वाटप

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 एप्रिल 2020

सतत दुर्लक्षीत असणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांकडे कोरोना विषाणूच्या महामारीतही आवश्यक मदत मिळत नसल्याने पत्रकार संघासह पद्मावती ट्रस्ट व अन्नपूर्णा ट्रस्टने मदतीचा हात पुढे केला.

नांदेड : सतत दुर्लक्षीत असणाऱ्या व प्रत्येक मागण्यांसाठी संघर्ष करावा लागणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांना कोरोनाच्या महामारीतही त्यांना आवश्यक मदत मिळत नसल्याने रविवारी दक्षीण मतदार संघाचे आमदार मोहन हंबर्डे यांच्या हस्ते मास्क व सॅनिटायझर देण्यात आले. अशा गंभीर परिस्थितीत पत्रकार संघासह सर्वांनी विक्रेत्यांसोबत राहण्याचा संकल्प करण्यात आला.

वृत्तपत्र विक्रेत्यांना हातभार
मीमांसा फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, समीक्षा व मंथन क्रिएटिव्ह ग्रुपच्यावतीने मागील बारा वर्षापेक्षा अधिक वर्षापासून वृत्तपत्र क्षेत्रातील वृत्तपत्र विक्रेते, मशीन ऑपरेटर, छायाचित्रकार, संगणक चालक यांच्यासह इतरांचा दरवर्षी अपघाती विमा पॉलीसी काढणे, त्यांना भेटवस्तू देण्यात येत आहे. एवढेच नव्हे पत्रकारिता पुरस्कारातून या क्षेत्रातील संबंधीत प्रत्येक घटकाला पुरस्कार आणि विशेष सन्मान करून त्यांच्या कामाची प्रतिष्ठा वाढवत त्यांचा दरवर्षी गौरव करण्यात येतो. सतत दुर्लक्षीत असणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांकडे कोरोना विषाणूच्या महामारीतही आवश्यक मदत मिळत नसल्याने पत्रकार संघासह पद्मावती ट्रस्ट व अन्नपूर्णा ट्रस्टने मदतीचा हात पुढे केला.

हेही वाचा....रेशनच्या धान्याबाबत राज्य सरकारचा घोळ! कोण म्हणाले वाचा...

मास्क व सॅनिटायझर वाटप
महापालिकेचे स्विकृत सदस्य नगरसेवक बालाजी जाधव, अन्नपूर्णाच्या अध्यक्षा सुषमा गहेरवार व संपादक रूपेश पाडमुख यांच्या पुढाकारातून दक्षीण मतदार संघाचे आमदार मोहन हंबर्डे यांच्या उपस्थितीत वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष बालाजी पवार व श्री. वडगांवकर यांना मास्क व गरजू वस्तू देऊन दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

हेही वाचलेच पाहिजे.... Video : ‘कोरोना’शी लढा : नांदेडच्या आदित्यची ‘फेस शिल्ड’ किट ठरतेय वरदान

अडचणीच्या काळात सोबत राहू
लॉकडाऊन असल्याने सर्व वृत्तपत्र टाकणाऱ्यांना न बोलावता प्रातिनिधीक स्वरूपात संघटनेच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले होते. आमदार मोहन हंबर्डे, सुषमा गजेरवार, पत्रकार प्रेस परिषदेचे सखाराम कुलकर्णी, संपादक रूपेश पाडमुख आदींनी त्यांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही देण्यात आली. लॉकडाऊनच्या काळात वृत्तपत्र क्षेत्रातील कुठल्याही घटकांना कशाचीही गरज भासल्यास संपर्क करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने करण्यात आले आहे.

भाजपकडून धान्य वाटप 
जिव धोक्यात घालून वृत्तपत्र वितरीत करणाऱ्या मुलांना भाजपच्या स्थापना दिवसानिमित्त भाजप महानगराध्यक्ष प्रविण साले यांच्यावतीने धान्य वाटप करण्यात आले. यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, व्यंकट मोगले, सुनील उबाळे, विनायक सगर, वृत्तपत्र वितरण संघटनेचे बालाजी पवार आदींची उपस्थित होती. भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिवसानिमित्त राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी विविध उपक्रम राबविण्याच्या सुचना दिल्या. या अनुषंगाने भाजप महानगराध्यक्ष प्रविण साले यांनी साईबाबा मंदिर, चैतन्यनगर येथे वृत्तपत्र वितरण करणाऱ्या पन्नास मुलांना धान्य वाटप करण्यात आले. या निमित्ताने सायंकाळी शहरातील पोर्णीमानगर येथे प्रविण साले व व्यंकट मोगले यांच्या हस्ते धान्य वाटप करण्यात आले. यावेळी कुणाल गजभारे, सुरेश निलावार, विशाल शुक्ला, बाळु टोम्पे, अनिल जोंधळे आदींनी परिश्रम घेतले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Distribution of sanitizers to newspaper vendors, nanded news