अखेर..! माजलगावचे नगराध्यक्षपद रिक्त, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

Beed News
Beed News
Updated on

माजलगांव (जि.बीड) : येथील नगराध्यक्ष सहाल चाउस हे २०१६ मध्ये थेट जनतेतुन निवडून आले होते.  मागील तीन महिन्यांपासुन म्हणजेच १७ मार्च पासून भ्रष्टाचार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असल्यामुळे नगर परिषदा नगर पंचायत अधिनियम १९६५ चे कलम ५६;३ नुसार सदर पद रिक्त करण्याबाबत तसेच पदभार हस्तांतरीत न केल्याबाबत दाखल अर्जावर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी माजलगांवचे नगराध्यक्ष पद रिक्त केले आहे. असे आदेश दिले आहेत  त्यामुळे नगर परिषदेचे अध्यक्ष पद हे रिक्त झाले आहे.

मागील चार महिन्यांपासुन माजलगांव नगर परिषद ही आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राज्यभर चांगलीच गाजली, असुन या प्रकरणात येथील अध्यक्ष सहाल चाउस यांना जबाबदार धरुन त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. मार्च २०२० पासुन सहाल चाउस हे न्यायालयीन कोठडीत आहेत. तेंव्हा पासुन अध्यक्ष पदाचा पदभार हा कोणालाही देण्यात आलेला नाही.

त्यामुळे मागील तीन महिन्यांच्या लॉकडाऊनच्या तसेच इतर कार्यालयीन कामांवर मोठा प्रभाव पडत होता जनता त्रस्त झालेली होते. २७ मे रोजी अध्यक्ष सहाल चाउस यांच्यावर अविश्वास ठरावच्या अस्त्राचा देखील वापर झाला. परंतु न्यायालयाच्या आदेशाने हे अस्त्र निष्प्रभ झाले परंतु प्रकरणाने पुन्हा कलाटणी घेतली व नगर परिषदा नगर पंचायत अधिनियम १९६५ चे कलम ५६;३  नुसार सतत तीन महिने परवानगी न घेता गैरहजर असल्याचे दाखवून कार्यवाही प्रस्तावित करण्यात येवून त्यात अध्यक्ष पदाचा पदभार देण्या बाबतची मागणी करण्यात आली हेाती.

त्यावर सुनावणी होवून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी माजलगांवचे नगराध्यक्ष पद हे रिक्त करीत असल्याबाबत त्यांचे पत्र जा. क्र. २०२०/जिबी/डेस्क.१/एमयुएन/कावि. ता, २८ जुन २०२० अन्वये घोषित केले. पदभार  देण्यासंदर्भात प्रधान सचिव यांचे मार्गदर्शन मागविले आहे.


दरम्यान माजलगांव नगर परिषदेचे अध्यक्षपद हे रिक्त झाल्यामुळे आता अध्यक्षपदाचा पदभार कोणाकडे जातो की त्यातही रस्सीखेच आहे. उपाध्यक्ष, नगरसेवक, वरिष्ठ कर्मचारी हे त्यावेळी जबाबदारीच्या कक्षेत होते त्यामुळे त्यांच्यावरील जबाबदारी निश्चिती संदर्भात मागणी होवुन नगर परिषद बरखास्तीची देखील मागणी आ. प्रकाश सोळंके यांनी केलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com